या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. वर, कृत्तिकांमध्ये वसंत संपात होता हे सिद्ध करण्यासाठी आपण असे पाहिले की, नक्षत्रचक्राचा आरंभ कृत्तिकांपासून केलेला आहे; दुसरे उदगयन माघशुक्लपक्षांत होत असे; तिसरें दक्षिणायननक्षत्र पित्रधिष्ठित होते; व चवथें शारदसंपाताजवळील नक्षत्रामधून सांपातिक याम्योत्तर वृत्त जात असण्याचा संभव असतो. सारांश, जर वर्षारंभ माघांत होत होता असे मानले तर त्याशी क्रान्तिवृत्तांतील अयनादि प्रधान बिन्दूची नक्षत्रासंबंधी स्थाने अगदी जुळतात व अशा रीतीने ती गोष्ट ती अप्रत्यक्षपणे स्थापित करतात. आतां वैदिककाळी फाल्गुनी पौर्णिमेला उदगयनारंभी वर्षारंभही होत असे ही गोष्ट सिद्ध करण्याला अशाच प्रकारचा काही पुरावा मिळण्यासारखा आहे की नाही हे पहावयाचें. ऋतु एक महिना मागें यावयास स्थूलमानाने वसंतसंपात दोन विभागात्मक नक्षत्रे मागें यावयास पाहिजे. ह्मणून उदगयनारंभ जर माघांत न होतां फाल्गुनांत झाला तर वसंतसंपातही कृत्तिकांच्या पुढे दोन नक्षत्रे ह्मणजे मृगशीर्षात येईल. तसेंच दक्षिणायन व शरत्संपात अनुक्रमें उत्तरा फाल्गुनी व मूळ या नक्षत्री होतील. यासाठी संपातादि बिन्दूंची अशा प्रकारची क्रान्तिवृत्तांतील स्थिति दाखविण्याला वैदिक ग्रंथामध्ये काय आधार आहे हे आतां पहावयाचें. कृत्तिकांप्रमाणे मृग हेही नक्षत्रांचे मुख होते असे वैदिक ग्रंथामध्ये स्पष्टपणे मटलेलें कोठेही आढळत नाही. तरी मृगशीर्ष याचे दुसरें नांव जे आग्रहायणी त्यावरून तसे दिसते.