या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे पुस्तक छापून काढण्याबद्दल विचारिले व त्यांनी ते मोठ्या संतोषाने ताबडतोब कबूल केले. असो. वर सांगितलेच आहे की, प्रस्तुत पुस्तक मूळग्रंथाचे समग्र भाषान्तर नसून सारांशरूप मात्र आहे. तथापि, त्यांत कोणतीही महत्वाची गोष्ट गाळलेली नाही, व पूर्वापार संबंध तोडलेला नाही. मूळ पुस्तकाप्रमाणे जरी यांत भाग पाडलेले नाहीत तरी लिहिताना अनुक्रमानें भागशः लिहिल्यामुळे वाचतांनाही ते सहज कळण्यासारखे आहेत. त्यांचे थोडक्यांत येथे दिग्दर्शन करतो. प्रथमतः [ पाने १--५ वेदकालनिर्णयाचे महत्व व त्याच्या निरनिराळ्या पंडितांनी स्वीकारलेल्या निरनिराळेम पद्धति सांगितल्या आहेत. पुढे पाने ६-१६] वैदिककाळच्या पंचांगाचे थोडे वर्णन देऊन यज्ञयागाचे काळ व वर्षारंभ यांचे विवेचन केले आहे. यानंतर [ पाने १६-२६ ] वसंतसंपात एकाकाळी कृत्तिकांत होता असें दाखविणाऱ्या गोष्टी देऊन तो काळ ठरविला आहे. यापुढे [ पाने २६-४१ ] मृगशीर्षांत वसंतसंपात होता हे दाखविण्यासाठी मृगशीर्ष नक्षत्राचे दुसरे नांव जे आग्रहायणी त्याच्या व्युत्पत्तीचा विचार करून ते एकदा पहिले नक्षत्र होतं असें दाखविले आहे; व त्यांतच आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्यु. better. त्पत्तीवर आणखी चुकीच्या गोष्टी कशा रचल्या गेल्या हे सांगून बलण्या संपाताच्या आंदोलनाच्या कल्पनेचे एक शक्य कारण दिले आहे. त्याच्या पुढे [पा. ४१-९७] मृगाच्या शीर्षाविषयीच्या वेद,