या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. हे कारण समाधानकारक वाटत नाही. संदर्भावरून मार्गशीर्षाला वर्षारंभाचा महिना ह्मणण्याचा आशय स्पष्ट दिसतो. सूर्यपंडित नांवाच्या एका ज्योतिष्याने आपल्या परमार्थप्रपा नांवाच्या गीतेवरील टीकेमध्ये मटले आहे की, मार्गशीर्षाचे दुसरें - नांव आग्रहायणिक असे आहे, व त्यांतील पौर्णिमा संवत्सराची पहिली रात्र असे. असा अर्थ घेतल्यास भगवद्गीतेतील वरील वचन आग्रहायणिक शब्दाच्या चुकीच्या व्युप्तत्तीवर लिहिले गेले असावें असे दिसते. परंतु या शब्दाची व्युप्तत्ति नीटपणे घेतल्यास त्यांत घोटाळा होण्यासारखे काहीच नाही, आग्रहायणिक हा साधित शब्द असल्यामुळे त्या नावाचा महिना वर्षारंभाचा असणे शक्यच नाही. परंतु त्यावेळी अंग्रहायण मणजे मृगशीर्ष, हे पहिले नक्षत्र ही कल्पना अगदी नाहीशी होऊन मार्गशीर्ष महिनाच वर्षारंभाचा होता असे मानूं लागले; व या नव्या कल्पनेला एकदां गीतेमध्ये स्थान मिळाल्याबरोबर तिचा त्वरित सर्वत्र प्रसार होऊन विद्वानांनीही आपले मत तसें बनविले. या चुकीच्या कल्पनेचा इतर विद्वानांनीच अवलंब केला असे नाही, तर ज्योतिषी लोकांनीही तसेंच केलें. पण त्याचा परिणाम काय झाला पहा. जुन्या ज्योतिषग्रंथांमध्ये वर्षारंभ उत्तरायणीं होत असे. ह्मणजे वर्षाचा पहिला महिना तोच उत्तरायणाचाही पहिला यद्वा मृगशिरः पूर्णिमासंबंधेन वर्षादिरभिहितरतस्मिन्नेवाग्रहायणीत्यभिधानात् । आग्रहायणं यस्यां साग्रहायणी । अत एव आग्रहायणिक इति मार्गशीर्षनाम । अतोऽस्य मासस्य मुख्यत्वाद्विभूतिमत्वम् ।