या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. महिना असे. आता मार्गशीर्षी पौर्णिमेला संवत्सराची प्रथम रात्र ह्म-- टले तर स्वाभाविकपणेच त्यादिवशीं उत्तरायण सुरु झालें असें ज्योतिषी समजणार. व मग अर्थात् दक्षिणायनबिन्दु मृगशीषर्षी* येणार ह्मणजे वसंत संपात त्याच्या मागे ९० अंश येणार. सूयसि--- द्धान्तामध्ये मृगशीर्षाचे विषुवांश रेवतीपासून ६३ दिले आहेत.. त्यावरून मृगशीर्षाच्या मागे ९० अंश ह्मणजे रेवतीच्या मागे २७ अंश वसंतसंपात आला. परंतु वैदिक ग्रंथांमध्ये नक्षत्रारंभ कृत्तिका पासून होत असून माघामध्ये उत्तरायण होत असे असे सांगितले आहे. यावरून त्यावेळी वसंतसंपात रेवतीच्या पुढे निदान २७ अंश तरी होता. आतां या दोन गोष्टींचा मेळ कसा घालावयाचा ? वेदही खोटे नाहीत व गीताही खोटी नाही. दोन्हीही सारखींच प्रमाण. पण दोहोंमध्ये असा विरोध. ह्मणून आमच्या ज्योतिष्यांनी संपाताच्या आंदोलनाची, ह्मणजे संपात क्रान्तिवृत्तांत सबंध प्रदक्षिणा न करितां रेवतीच्या पुढे मागे २७ अंशच हालतो अशी, कल्पना लढवून वरील विरोध नाहींसा केला. अर्वाचीन ज्योतिर्विदांनी ही कल्पना गणितशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध आहे असें ठरविले आहे; पण

  • मगामध्ये पूर्णचंद्र ज्या दिवशी होईल ती मार्गशीर्वी पौर्णिमा. पौर्णिभेच्या दिवशी चंद्रसूर्य समोरासमोर हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असणार. हणजे मार्गशीर्षी पौर्णिमेला सूर्य मृगनक्षत्रापासून १८० अंशावर असेल. आतां त्या दिवशी जर अर्वाचीन पद्धतीचे उत्तरायण शुरू होतें असे मानले तर अर्थात्च वसंतसंपात मगाच्या मागे फक्त ९० अंशांवर येईल. ( आकृति पहा).