या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. तिला भारतीय ज्योतिषग्रंथामध्ये स्थान कसे मिळाले याचे दुसरें . सयुक्तिक कारण अद्यापि कोणी दिलेले नाही. बेंटले व व्हिटने यांच्या मते या आंदोलनाच्या सीमा, रेवतीच्या पुढे २७ अंशांवर ह्मणजे कृत्तिकांमध्ये सूर्य असतांना वसंतसंपाती वर्षारंभ होत असे, या गोष्टीवरून ठरविल्या असाव्या. परंतु एवढीच गोष्ट आंदोलनाची कल्पना उत्पन्न करण्यास पुरेशी नाही. रेवतीच्या दोन्ही बाजूंस २७ अंशावर वसंतसंपात होत असे, असें कायमपणे समजल्याशिवाय काही आमच्या ज्योतिष्यांनी आंदोलनाची कल्पना काढिली नाही. यासाठी त्या कल्पनेचे वर सांगितलेलें कारणच खरे असले पाहिजे. असो. तर अशा रीतीन मार्गशीर्षी पौर्णिमेला उदगयनी वर्षारंभ होत असे, असे मानल्यास वर सांगितलेली अपरिहार्य अडचण येते. अर्थात् ही कल्पना आपल्याला सोडून दिली पाहिजे. रेवतीच्या मागे २७ अंशांवर वसंतसंपात असावयास आपल्याला सांप्रत चालू असलेल्या संपात प्रदक्षिणेच्या आरंभी तरी गेले पाहिजे, अथवा सुमार ६०० वर्षे आणखी वाट तरी पाहिली पाहिजे. म्हणून असली निरर्थक अनुमाने ज्यांपासून निघतात त्या गोष्टीच आपण सोडून दिल्या पाहिजेत. आतां "मार्गशीर्षी पौर्णिमा वर्षाची प्रथम रात्र" या वचनाचा दुसराही कोणता अर्थ होऊ शकत नाही. या दिवशी उद भारतीय ज्योतिःशास्त्र या ग्रंथांत दीक्षितांनी हेच कारण दिले आहे. (पान ३३२).