या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ३७ गयन होत असे असा अर्थ घेतल्यास काय परिणाम होतो हे आता आपण पाहिलेच. आतां वर्षारंभ धरण्याची दुसरी पद्धति म्हणजे वसंतसंपातापासूनची; व तीप्रमाणे पाहूं गेलें तरी, *मागशार्षीत वसंतसंपात येण्यास तो अभिजित्नक्षत्री असला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो काळ इ. सनापूर्वी २०,००० वर्षे ढकलिला पाहिजे. परंतु हे तर असंभवनीय दिसते. या सर्व विवेचनावरून आग्रहायणी याचा सध्यां प्रचलित असलेला अर्थ घेऊन चालावयाचें नाहीं हे उघड होते. आतां उरला अर्थ, त्या नांवाच्या नक्षत्रामध्ये सूर्य असतांना वर्षारंभ होत असे हा. मग त्या नक्षत्राचें नांव अग्रहायण असो, आग्रहायणी असो, अगर अग्रहायणी असो. ते नक्षत्र वर्षामध्ये पहिले होतें एवढा आपल्या मुद्याचा प्रश्न. आता यापुढे अग्रहायण म्हणजे मृगशीर्षनक्षत्र असेंच घेऊन चालावयाचे. असो. तर मग फाल्गुनामध्ये उदगयन झाले म्हणजे त्या अन्वये वसंतसंपाती वर्षारंभ मृगशीर्षी ऊर्फ अग्रहायणी होणार. म्हणजे माघांत उत्तरायण झालं असतां जसा वसंतसंपात कृत्तिकांत

  • मार्गशीर्षी पौर्णिमेला वसंतसंपात होत असे म्हणजे त्या दिवशी सूर्य वसंतसंपाती होता असे मानले म्हणजे वसंतसंपात मगशीर्षाच्या पुढे किंवा मागे १८० असला पाहिजे. अभिजित् नक्षत्राचा क्रान्तिवृत्तांशी (यांतच सर्व नक्षत्रं आहेत ) काही संबंध नाही. तरी त्यांतून जाणारे याम्योत्तरवृत्त मृगापासून १.८० अंशावरून जाते. एवढ्यावरून व या वृत्तामध्ये क्रांतिवृत्ताजवळ एवढी मोठी तारा दुसरी नसल्यामुळे त्यांत वसंतसंपात होईल असें वर म्हटले आहे. खरोखर अभिजितु नक्षत्रांत वसंतसंपातबिंदु कधी यावयाचा नाही.'