या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. होतो तसेंच येथेही.. याप्रमाणे तैत्तिरीय ब्राह्मणांतील " फाल्गुनी पूर्णमास हे संवत्सराचे मुख आहे " या वचनाला अंग्रहायणामध्ये दडून राहिलेल्या गोष्टीने पाठबळ मिळतें. मृगशीर्षामध्ये वसंतसंपात झाला ह्मणजे मूळामध्ये शारदसंपात येतो. व कदाचित् मूळनक्षत्राचे नावही या गोष्टीवरून पडले असेल; कारण, त्यावेळी वर्षारंभी सूर्यास्ताबरोबर उगवणारे तेंच नक्षत्र होते. ही मूळशब्दाची व्युप्तत्तीही काही अंशी मृगामध्ये वसंतसंपात होता असे दाखविण्यास उपयोगी पडेल. मागे सांगितलेच आहे की, वर्षाची दोन अयने जी उत्तर व दक्षिण त्यांचा वैदिककाळचा अर्थ व नंतरचा अर्थ यामध्ये भेद आहे. वैदिककाळी सूर्याच्या उत्तरगोलार्धातील कालाला उत्तरायण ह्मणत; परंतु नंतर, त्याचा अर्थ मकरपासून कर्कसंक्रमणापर्यंतचा काळ असा झाला. ह्मणजे पूर्वी, पितृयान किंवा हल्लींचें दक्षिणायन याचा आरंभ कर्कसंक्रमणापासून होई. उदगयन फाल्गुनी पौर्णिमेला झाले ह्मणजे, अर्थात् दक्षिणायन किंवा पितृयान भाद्रपदी पौर्णिमेला होणार, ह्मणजे भाद्रपदाचा कृष्णपक्ष हा पितृयानाचा पहिला पंध्रवडा झाला. ह्मणून त्यालाच विशेषेकरून पितरांचा पंध्रवडा ऊर्फ पितृपक्ष हे नांव मिळाले. अजूनही आपण याच पक्षांत पितरांची विशेष श्राद्धं करितो. भाद्रपदवद्यपक्षाला पितृपक्ष हे नांव कां मिळाले याचे कारण कोणीही आजपर्यंत दिलेले नाही.

  • पक्ष. महालयश्राद्धे.