या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. परंतु फाल्गुनी पौर्णिमेला वर्षारंभ होतो या संहितावचनाचा नीट अर्थ घेतल्यास, ह्मणजे त्या पौर्णिमेला उत्तरायणारंभ होत असे असे समजल्यास, ह्या गोष्टीचा अगदी सहज रीतीने उलगडा होतो. हणजे त्यावेळी दक्षिणायनाचा आरंभ भाद्रपदी पौर्णिमेला होत असे व ह्मणून त्याच्या पुढच्या पक्षाला पितृयानाचा पहिला पंध्रवडा ऊर्फ पितृपक्ष ह्मणूं लागले. आतां, आपलाच पितृपक्ष भाद्रपदांत होतो असे नाही. पारशी लोकांचाही तेव्हांच होतो. ही गोष्ट फारच महत्व ची आहे. कारण ज्या जुन्या काळासंबंधी आपण विचार करीत आहों त्या काळी भारतीय, इराणी व हेलनिकआर्य* हे सर्व एकच होते. आतां, आपली उपपत्ति जर खरी असेल तर तिला या आर्य लोकांच्या निरनिराळ्या शाखांच्या चालीरीती, दंतकथा वगैरे गोष्टींवरून चांगला आधार मिळेल. मृगशीर्षात वसंतसंपात होता हे दाखविण्यास असा पुरावा पुष्कळ आहे हे आपण पुढे पाहूं. सध्यां आपण प्राचीन अवेस्तिक पंचागासंबंधे डॉ. गिइगरने केलेल्या अनुमानांचा थोडा विचार करूं. त्याने "मध्यर्यो " ह्मणजे “वर्षाचा मध्य' हा शब्द आधारभूत धरून, त्यावरून प्राचीन अवस्तिक पंचागांतील वर्षाचा आरंभ दशिणायनापासून होत असे असे अनुमान केले आहे. ही गोष्ट आपल्या उपपत्तीशी अगदी जुळते. पारशी लोकांनी असल्या

  • ग्रीक. 4मयों व इंग्रजी ( Midyear मिडइयर ) यांचे साम्य दिसते.