या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. प्रत्येक बाबतीत आपल्या अगदी उलट मत खीकारीले आहे. व ह्मणून आपला वर्षारंभ उत्तरायणी झाला तर त्यांचा त्याच्या उलट झणजे दक्षिणायनी व्हावयाचा व असेंच खरोखर आहे. पारशी व हिंदु यांच्या जुन्या पंचागाचा मेळ इतकाच आहे असे नाही. वर सांगितलेच आहे की, दोघांचेही पितृपक्ष भाद्रपदांत एकाचवेळी येतात. पारशी लोकांचा पहिला महिना वशिनम् ह्मणजे पितृमास हा आहे, व त्याचा आरंभ दक्षिणायनापासून होतो. या महिन्यापासून चवथा महिना तिष्ट्रयेहे, किंवा तिष्ट्याचा मास हा आहे व हे. तिष्ट्यनक्षत्र झणजे "सिरिअस्चा तारा होय असे मानतात. आतां आपल्याकडे भाद्रपदापासून मोजले असतां ४ था महिना मार्गशीर्ष मणजे मृगशीर्षाचा मास हा येतो; व मृगशीर्ष व सिरिअस हे अगर्दी जवळच आहेत. तसेंच फ्रवशिनम् महिन्यामध्ये दक्षिणायनी वारंभ धरिला झणजे दथुषो महिन्याचा आरंभ बरोबर वसंतसंपाती होतो. हा इथुषो महिना सृष्टिकर्त्या अहुरमझ्दाचा आहे. यावरून तो एकदा वषोरंभाचा महिना असावा असे दिसते. याप्रमाणे जुन्या अवेस्तिक पंचांगामध्ये वसंतसंपाती आरंभ होणाऱ्या वर्षाच्या कांहीं खुणा आपल्याला आढळतात. या गोष्टी व विशेषेकरून दोघांचे पितृपक्ष एक असणे हे केवळ काकतालीय असेल असें संभवत नाही. आतां, त्यांच्यांत वर्षारंभ उत्तरायणांतून दक्षिणायनांत जरी गेला तरी पितृपक्षासारखी पूर्वापार चालत आलेली पवित्र गोष्ट स्थानभ्रष्ट करणे हे त्यांस योग्य वाटले नाही. मणून अजूनही दोघांचे पितृपक्ष एकच आहेत.

  • व्याध,