या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. - याप्रमाणे तैत्तिरीयसंहिता व दुसरी ब्राह्मणे यांत असलेल्या फल्गुनीपूर्णमास वर्षाचें मुख होतें या वचनाचा स्वाभाविकपणे संदर्भावरून होणारा-म्हणजे त्या दिवशी उत्तरायण होत असे असा-अर्थ घेतल्यास, व मृगशीर्षवाचक अग्रहायण शब्दाचा वर्षारंभ करणारे असा खरा अर्थ घेतल्यास, त्या नक्षत्रामध्ये एकदा वसंत संपात होता हे उघड होते. पितृपक्षाच्या काळावरूनही असेंच दिसते. व त्याच वेळी पारशी लोकांचाही पितृपक्ष येतो या गोष्टीवरून वरील ह्मणण्यास चांगला सबळ आधार मिळतो. कृत्तिकांमध्ये वसंतसंपात होता ही गोष्ट अशाच प्रकारच्या पुराव्यावरून वर सिद्ध केलेली आहे; व म्हणून मृगशीर्षासंबंधानेही अशाच प्रकारचे अनुमान करावयास काही हरकत दिसत नाही. मृगशीर्षापासून नक्षत्रचक्राला आरंभ होत असे असे सांगणारे स्पष्ट वाक्य जरी कोठे आढळत नाही, तरी तसें मानावयास बहुतेके भागच पडेल अशा काही गोष्टी पुढील विवेचनांत येणार आहेत; त्यांवरून वरील अनुमानसंबंधाने शंकेला बहुतकरून जागाच राहणार नाही. आकाशाच्या ज्या भागामध्ये मृगशीर्षनक्षत्रपुंज आहे तो भाग सवात अत्यन्त प्रेक्षणीय आहे. एकाद्या निरन रात्री सहज आकाशाकडे पहाणाऱ्याचेही लक्ष या तारकापुंजाच्या मनोहर स्वरूपाकडे वेधल्या वांचून रहाणार नाही. मग प्राचीन आर्यांनां तर त्यांच्यावेळी या आकाशाच्या भागामध्ये वर्षारंभी सूर्योदय होत असल्यामुळे तो अधिकच मनोवेधक झाला असला पाहिजे. या पुंजामध्ये व्याधासह पांच