या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय.. अंतरिक्षांत जाऊन नक्षत्र रूपाने राहिलेली दिसतात." ऋग्वेदांत शीर्षच्छेदाविषयी याच प्रकारचे वर्णन नाही. तरी त्यांत प्रजाप. तीची गोष्ट दिली आहे. दुसऱ्या ठिकाणी ऋग्वेदामध्ये इन्द्राने वृ. त्राचे शिर छेदिले व वृत्र हा मृग रूपाने दिसला अशी वर्णने आहेत. यावरून ऋग्वेदांत मृगाच्या शीर्षाचंच वर्णन आहे असें दिसते. ग्रीक पुराणामध्ये सुद्धा ही गोष्ट आली आहे. अपालो देवाने आपली बहीण ओरायनवर प्रीती करते हे पाहून क्रोधानें तिच्याकडून समुद्रातील एका दूरच्या वस्तूचा बाणानें छेद करविला, व ती वस्तु ओरायनचेंच शिर होते असे आढळून आले. यावरून, आपल्याला शरविद्ध असें छेदून टाकिलेले मृगाचे शिरच कोठे ते पाहिले पाहिजे. अमरसिंहाने मृगशीर्षाच्या वर असलेल्या तीन तारांना इन्वका हे नांव दिले आहे. पण काही जणांच्या मताप्रमाणे ओरायन पुंजाच्या शिरोभागी असलेल्या तीन लहान तारानांच जर मृगशीर्ष समजले तर मृगशीर्ष व इन्वका ही एकच होतात. ह्मणजे अमराने दिलेला भेद निरर्थक होतो. यासाठी सबंध मृगाची आकृति या पुंजांत आहे असें न समजता फक्त शरविद्ध असे डोकेंच आहे असे समजले पाहिजे. असे समजल्यावर ही आकृति निश्चित करणे कठीण नाही. कारण वरील गोष्टीमध्ये जो बाण आला आहे तो ओरायनाच्या पट्यांतील तीन तारा + मृगशीर्ष मृगशिरस्तस्मिन्नेवाग्रहायणीः । इन्वकास्तच्छिरो देशे तारका निवसन्ति याः ॥