या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राचीन इतिहासा ब्राह्मणे व पुराणे, यांतील व तशाच ग्रीकपुराणांतील गोष्टी देऊन त्यांचे निकट साम्य दाखविले आहे. नंतर [पा. ६७-७४ ] ग्रीक ओरायन व त्याचा पट्टा यांचे आपला प्रजापति ऊर्फ यज्ञ व करिबंधन त्याचे उपवीत यांशी व पारशांचा होम [ आपला सोम ] व त्याची मेखला यांशी साम्य दाखवून ग्रीक ओरायन शब्द वैदिक आग्रयण शब्दापासून निघाला असावा असे सांगितले आहे. [या सर्वांच्या मुळाशी वसंतसंपात एका काळी मृगांत होता ही कल्पना आहे.] त्यापुढें [पा. ७४-८४] वैदिककाळच्या लोकांचे ज्योतिषविषयक ज्ञान किती होते हे सांगून तेव्हां वसंतसंपात मृगशीर्षांत होता है दाखविण्यास प्रत्यक्ष पुरावा म्हणून ऋग्वेदांतील एक ऋचा व एक | सबंध सूक्त यांचे विवेचन केले आहे. शेवटी [पा. ८४-१००] वसंतसंपात त्याहूनही पुढे. म्हणजे पुनर्वसू नक्षत्रामध्ये होता असें मागे दाखविणारी एक गोष्ट देऊन पुन्हा एक वार तिन्ही काळ म्हणजे | कृत्तिकाकाळ, मृगशीर्षकाळ व पुनर्वसूकाळ यांच्या मर्यादा, सांगून ही भाग्य आरा अनुमाने इतर गोष्टींशी अगदी अविरुद्ध आहेत असे दाखविलं आहे. आपल्या इकडे वेदकालासंबंधाने आणखीही कित्येक जणांनी विज्ञानी ? लिहिले आहे. त्यांत कै. शं. वा. दीक्षित यांनी त्याचा बराच ऊहापोह केला आहे. प्रस्तुत त्या सर्वांचा विचार न करितां, या पुस्तकांत आलेल्या महत्वाच्या गोष्टीसंबंधे दीक्षितांचे मत काय आहे हे थोडक्यांत पहावयाचे आहे. लो. टिळकांनी 'ओरायन' हे पुस्तक इ. स. १८९३ या साली छापिलें. त्या वेळी " भारतीय ज्योतिः