या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. मृगव्याध ह्मणतो तोच रुद्र असे सांगितले आहे. आकाशगंगेला त्यावेळी काही विशेष नांव होतेसें दिसत नाही. पारशी, ग्रीक व भारतीय आर्य या तिघांमध्ये आकाशगंगेला साधारण असें नांव नाही. परंतु तिच्याकडे त्यावेळी लोकांचे लक्षच लागले नव्हत असे मात्र म्हणता येणार नाही. ग्रीक ज्योतिषामध्ये या गंगेच्या दोन्ही बाजूंनां कनिस मेजर व कॅनिस मायनर असे दोन कुत्रे आहेत. हे अगदी पूर्वीपासूनचेच आहेत की काय, याविषयी काही जणांस शंका आहे. परंतु प्लूटार्कच्या लिहिण्यावरून कनिस्, ओरायन व अर्सा हे पुंज ग्रीक लोकांनां अगदी पूर्वीपासून माहीत होते हे उघड दिसते. कारण तो ह्मणतो " ज्या पुंजांना इजिप्शियन लोक ऐसिस, हार्स व टायफॉन् ह्मणतात, त्यांसच ग्रीक लोक अनुक्रमें कॅनिस, ओरायन व अर्सा असें ह्मणतात." या प्लूटार्कच्या ह्मणण्यावरून हे तीन तरी पुंज मूळ ईजिप्शियन किंवा खाल्डियन नव्हत एवढे सिद्ध होते. यां पैकी अर्सा हे वेदांतील सप्तऋक्ष व पारशांचे हेप्टोइरिंग होत. यावरून प्लूटार्कच्या कॅनिस विषयींच्या ह्मणण्याच्याही सत्यतेबद्दल साक्ष पटते. झणजे कनिस, ओरायन व अर्सा हे पुंज आर्याचेच मूळचे आहेत यांत काही संशय नाही.

  • ऐ. ना. (३-३३) २ मोठा कुत्रा व धाकटा कुत्रा.