या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ वेदकालनिर्णय, वर्णिले आहे. त्या ठिकाणी दिव्य शब्दाचा अर्थ आकाशांतील असा उघड आहे. असो. या उत्तम लोकाला जाण्याचा मार्ग राखण्याकरितां ठेविलेल्या कुत्र्यांचेही दोन्ही वाङ्मयांमध्ये वर्णन आहे. आकाशगंगा ही स्वर्गाची ह्मणजे देवयानाची सीमा समजल्यास या गोष्टींचा सहज उलगडा होतो. म्हणजे ही दिव्य नाव व हे कुत्रे ह्मणजे, अर्गो नेविस व कनिस हे नक्षत्रपुंज होत. या विवेचनावरून आकाशांतील स्थितीवरून वरील कल्पना रचल्या गेल्या असेंच समजण्याचे कारण नाही. उलट पूर्वी अस्तित्वात असलेल्या कल्पनांवरूनही आकाशांतील ताऱ्यांना नांवें मिळाली असतील. अनार्य लोकांच्या पुराणकथांवरून असेंच दिसते. तरी वर सांगितलेल्या आर्यांच्या कथांची उत्पत्ति आतां सांगितल्याप्रमाणेच झाली असावी असे तिन्ही आर्य शाखांच्या गोष्टीतील विलक्षण सादृश्यावरून दिसते. आतां या निरनिराळ्या आर्यराष्ट्रांच्या गोष्टींतील कुत्र्यांच्या रंगरूपामध्ये काही भेद आढळतो. यावरून कदाचित् हे एक नसतील अशी शंका येईल. परंतु एकाच ग्रंथामध्येही त्यांचे निरनिराळे वर्णन असल्यामुळे अशी शंका निरर्थक होते. रंगरूप, वचनलिंग या गोष्टी यामध्ये फारशा महत्वाच्या नाहीत. ऋग्वेदांतील सरमा कुत्री ही व स्वर्गद्वार रक्षक कुत्रे ही देखील एकच होत असें दिसते. कारण इन्द्राच्या गाई शोधण्यासाठी तिला पाठविले असता पणींनी तिला गोंजारून दूध प्यावयास दिले. व मग ती परत