या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. आल्यावर गाई पाहिल्याचे नाकबूल करूं लागली. तेव्हां इन्द्राने तिला लाथ मारिली; त्याबरोबर ती दूध ओकली. आतां हे दूध ह्मणजे आकाश गंगेचे पाणी किंवा इंग्रजी शब्दाप्रमाणे दुधाच्या* नदीतील दूध हे सहज लक्षात येईल. ऋग्वेदामध्ये, शुनाशिरौ सी/ यांची स्वर्मातील दुधाचा पृथ्वीवर वर्षाव करण्याविषयी प्रार्थना केली आहे. मॅक्समुल्लरच्या मते हे शुनाशिरौ ह्मणजे कॅनिस उर्फ श्वानपुंजच होत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळांतील एका ऋचेत, ऋतुदेवता जे ऋभु त्यांना संवत्सरसमाप्तीचे वेळी श्वान जागे करीत का असे असे म्हटले आहे. हे वर्ण : कॅनिस उर्फ श्वानपुंज वर्षारंभी अथवा पितृयानाच्या शेवटी पूर्वेस सूर्योदयापूर्वी उगवत असे त्याचे आहे. या सर्व गोष्टींचा व विशेषतः श्वान वर्षारंभ करीत या गोष्टीचा त्यावेळी वसंतसंपात श्वानपुंजांत अथवा मगशीर्षांत होता असें मानिले म्हणजे चांगला उलगडा होतो. - या उपपत्तीवरून दुसन्याही कित्येक गोष्टींचा समाधानकारक अर्थ लावता येतो. मृगशीर्ष सूर्योदयीं उगवू लागले म्हणजे वसंत ऋतु सुरु झाल्यामुळे सर्व सृष्टि प्रफुल्लित होत असे व म्हणून पुराणा

  • मगशीषपुंज आकाश गंगेच्या जवळ आहे. इंग्रजीत आकाशगंगेला " दुधाचा मार्ग " अशा अर्थाचे Milky way असें नांव आहे. विष्णूचे वास्तव्यही क्षीरसागरांत आहे. तेव्हां हा क्षीरसागर व Milky way बहुधा एकच असावे.

क्र. ४-५७-५ १ (१-१६१-१३)