या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. मध्ये विष्णूचे जे सात्विक गुण सांगितले आहेत ते या मृगशीर्षामध्ये सर्व दिसतात असे म्हणण्यास हरकत नाही. पण हे नक्षत्र शरत्संपाती सूर्यास्ताबरोबर उगवू लागले म्हणजे सर्व गोष्टी बदलून जात; त्यामुळे, तें इंद्रवृत्रांच्या युद्धाची भूमि अथवा त्या भयंकर रुद्राचे स्थान असें वैदिक ऋषींच्या लक्षांत सहज आले असेल. तात्पर्य हे नक्षत्र सात्विक व तामसिक अशा दोन्ही गुणांचे झणजे विष्णु व रुद्र या दोहोंचेही द्योतक होते. ग्रीक कथांमध्ये कर्बेरास व आर्धास अशा दोन स्वर्गद्वाररक्षक कुत्र्यांचे वर्णन आहे. यांपैकी आस म्हणजे वैदिक वृत्र होय असे सर्व समजतात. पण हा वृत्र या यम लोकाच्या द्वाराशी कसा आला हे कोणी सांगितलेले नाही. परंतु ऋग्वेदांतील नमुचीच्या गोष्टीचा आपल्या प्रस्तुत उपपत्तीप्रमाणे अर्थ घेतल्यास सर्व गोष्टी नीट जमतात. वर एके ठिकाणी सांगितलेच आहे की वृत्र हा ऋग्वेदांत पुष्कळदां मग रूपानेही आला आहे. आतां नमुचि व वृत्र यांच्या वर्णनावरून ते दोन असावे असे काही वाटत नाही, खरोखर पाहिले असतां, शुष्ण, पिनु, कुयव, नमुचि व वृत्र ही सर्व इंद्राच्या एकाच शत्रूची नावे आहेत. आता, मृगरूपधारी वृत्राला अथवा नमुचीला इन्द्राने मस्तक छेदून मारिलें असें वर्णन आहे; व यावरून रुद्राने तोडिलेलें प्रजापतीचे शिर व हे मृगाचे शिर एकच होय असे सहज कळते.. आतो, इन्द्राने नमुचीला "परावति" ह्मणजे दूरच्या प्रदेशांत

  • ऋ. १-८०-७; ५-३२-३; ५-३४-२; ८-९३-१४. 1 ऋ. १-५३-७