या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय, मारिले आहे. या “ परावती" चा अर्थ यमलोक असा दिसतो. पण ऋग्वेदांत दहाव्या मंडळांत एके ठिकाणी, इन्द्राने नमुचीला मारून देवलोकाचे मार्ग मोकळे केले, असे वर्णन आहे. त्यावरून नमुचीला मारण्याचे नक्की ठिकाण देवयानाचे द्वार हे होय, वाजसनेयी संहितेमध्ये (१०-१४ ) एका याज्ञिक विधीच्या वर्णनांत नमुचीच्या वधाचा काल व स्थान ही दिली आहेत. त्यांत ऋत्विज यजमानाला पूर्णादि सर्व दिशांमधून व वसंतादि सर्व ऋतूंमधून ( वसंतापासून शिशिरापर्यंत ) नेल्यावर व्याघ्रचर्माखाली झांकलेला एक धातूचा तुकडा दूर फेंकून देऊन म्हणतो की, “ नमुचीचें शीर्ष फेंकून दिले. " या शब्दांचा जर काही अर्थ होत असेल तर तो हाच की, ऋतूंसंबंधाने पाहिल्यास शिशिराच्या शेवटी किंवा ऋग्वेदांत वर्णन केलेल्या पितृयानाच्या द्वाराशी वृत्राचा वध झाला. आतां यावरून नमुचि किंवा वृत्र, म्हणजे ग्रीक लोकांचा आर्धास हा यमलोकाच्या द्वाराशी कसा आला हे समजेल. या नमुचीच्या मरणाविषयीं तांड्य* ब्राह्मणामध्ये एक चमत्कारिक गोष्ट दिली आहे. इन्द्र व नमुचि यांमध्ये असे ठरले होते की, इन्द्राने नमुचीला रात्री मारूं नये, दिवसा मारूं नये, तसेच $ ऋ. १०-७३-७. स्वं जघंथ नमुचिं मखस्युं दासं कृण्वान ऋषये विमायं । त्वं चकर्थ मनवे स्योनान्पुथो दैवत्रांजसेव यानान् ॥ .. * तां. बा. १२-६-८ या ब्राह्मणांतील गोष्टीवरूनच पुढे पुराणांत हिरण्यकशिपूची व नरसिंह अवताराची गोष्ट आली असावी,