या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. शुष्क अथवा क्लिन्न अशा कोणत्याही शस्त्राने मारूं नये. ह्मणून इन्द्राने त्याला दिवस व रात्र यांच्या संधीस झणजे उषोदय होऊन सूर्योदय होण्याच्या पूर्वी पाण्याच्या फेसाने मारिलें. आतां यांचे हैं युद्ध दैनिक नसून वर्षाकालाच्या आरंभी होणारे आहे. हा वेळ नक्की म्हटला ह्मणजे देवयान व पितृयान यांच्या संधीचा होय. कारण ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे नमुचीच्या मरणाने देवलोकाचा मार्ग मोकळा होतो असे आहे. परंतु वरील गोष्टींतला पुढला भाग ह्मणजे इन्द्राने नमुचीला पाण्याच्या फेसाने मारिलें ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. ऋग्वेदातही आठव्या* मंडळांत इन्द्राने नमुचीचे मस्तक पाण्याच्या फेसाने छेदिले असे वर्णन आहे. आता हा फेंस कोठला आला ? अर्थात् नमुचीला जर देवयानाच्या द्वाराजवळ मारिलें आहे व त्याचे मस्तकही जर अजून तेथे आहे, तर हा फेंस आकाशगंगेशिवाय दुसरा कोठचा असणार ? आकाशाला सागराची व तारकांना फेंसाची उपमा देण्याची चाल संस्कृत वाङ्मयामध्ये पुष्कळ आहे. “नेदं नभोमडलमंबुराशि ताश्च तारा नवफेनभंगाः" । हे सुभाषित तर प्रसिद्धच आहे. शिवमहिम्न स्तोत्रामध्येही " तारागणगुणित

  • ऋ. ८-१४-१३. अपां फेनेन नमुचेः शिरः इन्द्रोद वर्तयः ॥ T श्लोक १७. वियद्व्यापी तारागणगुणितफेनोद्गमरुचिः

प्रवाहो वारां यः पृषतलघु दृष्टः शिरसिते । उ.गद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमित्पनेनैवोनेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः ॥ (पु. चा.)