या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दकालनिर्णय, ५३ फेनोद्दमरुचिः । " ह्मणजे "तारासमूहांच्या योगाने ज्याच्या फेणाचें रमणीयत्व वृद्धिंगत झाले आहे," असें रुद्राच्या मस्तकावरील गंगाप्रवाहाला विशेषण दिले आहे. शिवाय याच स्तोत्रकाराने पुढे २२ व्या* श्लोकांत "रुद्राने स्वकन्याभिलाषी प्रजापतीला बाणानें विद्धिले " या गोष्टीचा उल्लेख करून, ही सर्व गोष्ट अद्यापि आकाशांत धडधडीत दिसते आहे असे मटले आहे. यावरून शिवाच्या मस्तकावरील गंगा ह्मणजे रुद्राच्या ऊर्फ व्याधाच्या तान्याजवळ असलेला आकाशगंगेचा पट्टाच होय, असा कवीचा आशय स्पष्ट दिसतो. आतां, महिम्नकाराच्या प्रतिभेला जर आकाशगगेंत फेंस दिसला, तर वैदिक ऋषींच्याही उज्जल प्रतिभेला तो दिसला असल्यास त्यांत नवल काय ? पारशी धर्मग्रंथामध्येही मिश्र हा राक्षसांवर आपले वनंतरूपी वज्र फेंकतो असें वर्णन आहे. वनंत ह्मणजे पारशी दस्तुरांच्या मताप्रमाणे आकाशगंगाच होय. यावरून इ ही शिवस्वरूपाची कल्पना खरोखर फारच उदात्त आहे. सर्व विश्वाला व्यापणारी आकाशगंगा ज्याच्या मस्तकावर आहे, तो रुद्र स्वत: किती मोठा असला पाहिजे याची कल्पनाच करावयाला पाहिजे असे कवी ह्मणतो. रवगोलाला वलयभूत झालेल्या या आकाशगंगेचें याहून सरस वर्णन करणे अशक्य आहे.

  • प्रजानाय नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं

गतं रोहिद्भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा । धनुष्पाणे यांतं दिवमपि सपत्राकृतममुं वसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः ॥