या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शास्त्र" जरी छापले नव्हते तरी त्याची हस्तलिखित प्रत त्यांनी पाहिली होती. [ मूळ पुस्तकाचे प्रथम प्रकरण पहा.] तथापि दीक्षितांचा सदर ग्रंथ त्या नंतर छापल्यामुळे त्यांनी 'ओरायन' मध्ये प्रतिपादिलेल्या काही गोष्टींवर आक्षेप काढिले आहेत; त्यांचा थोडासा विचार करूं. - वर्षारंभ पूर्वी वसंतारंभी होता ही गोष्ट दोघांसही मान्य आहे. परंतु पुढे थोडा मतभेद आहे. तैत्तिरीयसंहितेंतील संवत्सरसत्राच्या अनुवाकांत जे तीन वर्षारंभ सांगितले आहेत, ते टिळकांच्या मतें उदगयनारंभीचे होत. परंतु त्यासंबंधाने दीक्षित म्हणतात [भा. ज्यो. पा. १३५ ] "ऋक्संहिताकाळी मृगांत संषात होता ही गोष्ट स्वतंत्रपणे सिद्ध होते. तिला फाल्गुनांत उदगयन असा अर्थ पूर्वोक्त अनुवाकांत करून त्याचा आधार घेण्याचे कारण नाही. तसा अर्थ करण्यास अडचणी आहेत." त्यांच्या मतें सदर फल्गुनीपूर्णमासाचा संबंध वसंताशीच आहे. एकंदरीत "*यजुर्वेदसंहिताकाळी व तदनुसार पुढे सर्व वैदिककाळी वर्षारंभ वसंतारंभी होत असे" व वेदांमध्ये " उदगयनाबरोबर वर्षारंभ होत असे, असें ज्ञापकही कोठें नाही,' असे त्यांचे मत होते.

  • भा. ज्यो. पान ६८. + भा. ज्यो. पान १३२.