या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. न्द्राचे फेनरूपी शस्त्र ह्मणजे आकाशगंगाच होय असें निःसंशय ठरते. तर याप्रमाणे संपातांची आपण मानिलेली स्थिति धरिली असतां नमुचीच्या गोष्टीचा चांगला उमज पडतो. - आतां मृगानुसारी भयंकर व्याध जो रुद्र तत्संबंधी गोष्टींकडे वळू. पौराणिक कथांमधील रुद्राचं वर्णन ह्मणजे मस्तकी गंगा,स्मशानवासाची आवड, किरातवेष, अशाप्रकारचे आहे. या गोष्टी, पितृयानाच्या द्वारी, ब आकाश गंगेच्या जरा खाली जा व्याध आहे तोच रुद्र समजल्यास, सर्व चांगल्या जुळतात. परंतु या गोष्टींचा प्रस्तुत प्रश्नाशी काही संबंध नाही. रुद्राची वर्षक्रमांतील स्थिति दाखविणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. वसंतसंपात ओरायनमध्ये असतांना प्रजापतीपासून ह्मणजे ओरायनपासून वर्षारंभ होत असे. आता रुद्रानें प्रजापतीला मारले; व पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रजापति, संवत्सर व यज्ञ हे शब्द समानार्थक आहेत. म्हणजे रुद्राने प्रजापतीला ऊर्फ यज्ञाला संवत्सरारंभी मारिलें असें होतं. याच गोष्टीच्या आधारे दक्षयज्ञाचा रुद्राने विध्वंस केला, ही कथा रचिली असावी. *महा

  • ततःसयज्ञविव्याध रौद्रेण हृदि पत्रिणा ।

अपक्रान्तस्ततो यज्ञो मगो भत्वा सपावकः ॥ स तु तेनैव रूपेण दिवं प्राप्य व्यराजत । अन्वीयमानो रुद्रेण युधिष्ठिर नभस्तले । यांत मृगाचे शीर्ष विद्धिले असे न ह्मणतां हृदय विद्धिलं असें झटले आहे. यावरून सगळाच मृग आकाशांत होता अशी भारतकाळी कल्पना असावी दिसते.