या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. भारतामध्ये "रुद्राने यज्ञाचे हृदय बाणाने विद्ध केलें; नंतर तो विद्ध झालेला यज्ञ अग्नीसह मृग होऊन पळून गेला, व त्याच रूपाने आकाशांत जाऊन रुद्र पाठीस लागला आहे अशा रूपाने तो तेथें विराजमान होतो आहे," असें वर्णन आहे. या गोष्टीवरूनच रुद्राला यज्ञहा हे नांव मिळाले. तांड्य*ब्राह्मणांतील ही प्रजापतीची गोष्ट जरा निराळी आहे. त्या ठिकाणी त्याने आपण होऊनच स्वतःला बळी देण्यासाठी देवांच्या स्वाधीन केले असे वर्णन आहे. परंतु हे कसेही असले तरी, रुद्राने यज्ञाला ऊर्फ प्रजापतीला संवत्सरारंभी मारिलें ही गोष्ट खरी. याकाळासंबंधाने दुसरीही एक सूचक गोष्ट आहे. शूलगव यज्ञ वसंत अथवा शरदऋतूंमध्ये आर्द्रानक्षत्री करावा असे आश्वलायन गृह्यसूत्रांत सांगितले आहे. हल्ली या वाक्याचा अर्थ, ज्या दिवशी चंद्र आद्रीत असेल त्या दिवशीं-मग तो दिवस कोणताही असो-या यज्ञाला आरंभ करावा, असा घेतात. पण, त्याचा मूळचा अर्थ वसंतामध्ये अथवा शरदऋतूमध्ये आनक्षत्री पूर्णमास किंवा दर्श असतांनां या यज्ञाला आरंभ करावा, असा असावासे वाटते. असा अर्थ घेतल्यास हा यज्ञ उत्पन्न झाला त्यावेळी वसंतसंपात आानक्षत्राजवळ होता असे होते. संपात काही काळाने मागे आल्यावर पूर्णमास किंवा दर्श हे आर्द्रानक्षत्री वसंतांत किंवा शरदांत होत नाहीसे झाल्यावर या यज्ञाचा आरंभदिवस. पूर्णमास किंवा दर्श

  • ता. ना. ७-२-१. आणखी तै. ना. ३-९-२२-१. 2 आ. गृ. सू. ४-९-२.