या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. हाच घेणे शक्य नसल्यामुळे आर्द्रा नक्षत्रांत चंद्र असलेला सदर ऋतूंतील कोणताही दिवस आरंभाला घ्यावा असा अर्थ झाला असावा. परंतु ही गोष्ट इतकी खात्री पटबिण्याजागी नाही. रुद्राजवळ कुत्रे आहेत या वाजसनेयी संहितेतील वर्णनावरून वैदिकऋषींना व्याधाजवळ म्हणजे रुद्राजवळ असलेला श्वानपुंज माहीत होतासें दिसते. हीही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. याप्रमाणे मृगशीर्षांत वसंतसंपात होता असें धरल्याने आपल्या पुराणांतील मुख्य मुख्य देवतांचे मूळ व स्थान त्या तारकापुजांत अथवा त्याच्या आसपास कोठेतरी आहे असे आपल्याला अगदी स्पष्ट दिसले. वसंतांत आढळणाऱ्या सात्विकवृत्तीची देवता *विष्णु, मेघविद्युदादिकांचा अधिपति रुद्र व वर्षारंभ करणारी यज्ञदेवता प्रजापति या सर्वांची एकाच जागी सांगड केली आहे. एकंदरीत आपल्या त्रैमूर्तीचे पूर्णस्वरूप या तारकापुजांत वसंतसंपात असतांना त्यांत प्रतिबिंबित झाले होते. दत्तात्रेयनांवाचे हे त्रिमूर्तिस्वरूप श्वानरूपी वेदांनी अनुगम्यमान असें वर्णिले आहे. मृगशीर्षांतील तीन तारे व त्यांच्यामागे असलेला श्वान यांवरून त्या स्वरूपाची कल्पना करणे कठीण नाही. आकाशाच्या दुस-या कोणत्याही

  • मगशीर्घपुज आकाश गंगेच्याजवळ आहे. इंग्रजीत आकाशगंगेला । दुधाचा मार्ग " अशा अर्थाचें milky way असें नांव आहे. विष्ण, वास्तव्यही क्षीरसागरांत आहे. तेव्हा हे क्षीरसागर व milky way बहुधा एकच असावे.