या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय, भागामध्ये या सर्व गोष्टी इतक्या मनोवेधक रीतीने एकत्र झालेल्या आढळणे कठीण आहे. मृगशीर्षाविषयी विचार करितांना ग्रीक लोकांनी ओरायनपुंजाला आपण स्वतः नांव दिले होतें असें प्लूटार्कच्या ह्मणण्यावरून स्पष्ट होते हे सांगितलेच आहे. त्या ठिकाणी या ह्मणण्याला पुष्टी आणणाऱ्या व ओरायनपुंजांत एकदा वसंतसंपात होता हैं दाखविणाऱ्या काही वैदिक गोष्टींचेंही परीक्षण केले. आतां या तारकापुंजाचें नांव व आकृति ही, ग्रीक पारशी व भारतीय आर्य लोक एकमेकांपासून दूर होण्यापूर्वीच ठरली होती, असे दाखवि. णाऱ्या गोष्टींचा विचार करावयाचा. या गोष्टी व कदाचित् ओरायन हे नांव सुद्धा त्या काळी वसंतसंपात मृगशीर्ष पुंजाजवळ होता असे मानल्यानेच चांगल्या समजतात, असे पुढील विवेचनावरून दिसून येईल. पूर्वी दाखविलेच आहे की, अग्रहायण या शब्दाची नाही तरी आग्रहायणी याची तरी परंपरा पाणिनीच्या वेळेपर्यंत आपल्याला लावितां येते, व हा शब्द नक्षत्र वाचक असल्यामुळे तो आग्रहायणी या पौर्णिमेच्या नावावरून झाला असें ह्मणणे चुकीचें आहे. हायन शब्द ऋग्वेदांत आलेला नाही. तरी अथर्ववेद व ब्राह्मणे यांत आलेला आहे. पाणिनीच्या मते हा शब्द 'हा' म्हणजे जाणे अथवा त्यागकरण या धातू पासून निघाला आहे, व त्याचे व्रीहीधान्य व वेळ असे दोन अर्थ आहेत. या हायन शब्दाचा अयन व आग्रयण ( ह्मणजे अर्धवार्षिक यज्ञ ) या श