या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालीनर्णया ब्दांशी संबंध लाविल्यास या दोन्ही अर्थीची कारणे समजतात. एकंदर वर्षाचे अयनात्मक दोन विभाग हे फार प्राचीन आहेत. देवयान व पितृयान या रूपांनी हे भाग पूर्वी होते याविषयी मागे विवेचन आलेच आहे. या अयन शब्दाला ह् लाविल्यास त्यापासून हायन शब्द सहज होईल. अशा प्रकारे आरंभी स्वर असलेल्या शब्दांना ह लावण्याची रीत अजूनही आपल्याला आढळते. उदाहरणार्थ, इंग्रजी हिस्टरी ( इतिहास ) हा शब्द इस्तरी यावरून निघाला आहे, असे मॅक्समुल्लरने आपल्या भाषाशास्त्र नांवाच्या ग्रंथांत दाखविले आहे. यासाठी अयन शब्दावरून हयन व त्यावरून पुढे हायन शब्द साधिल्यास त्यांत विलक्षण असे काही नाही. आता एकाच शब्दाची दोन रूपें असल्यास सहजच त्यांचा एका एका विशिष्ट कार्याकडे उपयोग होऊन त्यांमध्ये अर्थभिन्नत्व येते. अशा शब्दांनां संस्कृत कोशकार योगरूढ असें ह्मणतात. ह्मणजे या शब्दांमध्ये धात्वर्थ व रूढी या दोहोंचा थोडथोडा भाग असतो. त्याप्रमाणे अयन याचा पूर्वीचा अर्धवर्ष हा अर्थ कायम राहून हायन हा शब्द सबंध वर्षाचा वाचक होऊन बसला असावा. आतां अयनाचे हयन झाल्यावर आग्रयण मणजे अग्र+अयन हा अग्र+हयन किंवा अग्रहयण असा सहजच झाला; व हयनाचें पाणिनीच्या प्रज्ञादि गणाच्या अन्वयें हायन झाल्यावर अग्रयणाचे अग्रहायण असे रूप झाल. परंतु सध्यांच्या व्युत्पत्तिशास्त्राच्या नियमाप्रमाणे ही रीत जरी इतकी साधी दिसते तरी आपल्या वैयाकरणांनी ती मान्य केली