या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. नव्हती. आरंभी ह् लावणे किंवा असल्यास काढणे या तत्वावर बऱ्याच संस्कृत शब्दांची सहज व्युत्पत्ति सांगता येईल. मृगाच्या डोक्यांतील तीन तारांना इन्वका किंवा हिन्वका हे शब्द आहेत. पण संस्कृत व्याकरणकार ते दोन निरनिराळ्या इन्व् व हिन्व या धातूंवरून साधितात. पण त्यांनी, इन्व, हिन्व् ; अय् , हय् ; अट् , हट ; अन् , हन् ; अशा प्रकारची दुहेरी रूपें कां असावी याचे कारण कधीही दिलेले नाही. त्याचे ह्मणणे अयन शब्द अय-जाणे यापासून निघाला, हयन् हय्-जाणे यांपासून व हायन हा-जाणे यापासून निघाला. परंतु अशा रीतीने सगळ्या शब्दांची व्यवस्था न लावतां आल्यामुळे त्यांना पुष्कळदां *पृषोदरादि गणाचा आश्रय करावा लागला आहे. परंतु ते कसेही असले तरी इतकें खरे की, अयन व हायन या दोहोंचाही धात्वर्थ गमन असा आहे; च जेव्हां त्या दोहोंचाही कालभाग दाखविण्याकडे उपयोग होऊ लागला तेव्हां त्यांना विशिष्ट अर्थही मिळाला.. ह्मणजे अयन हा शब्द अर्धवर्षवाची झाला व हायन पूर्णवर्षवाचक झाला. आतां पहिल्या अयनाचा आरंभ तोच वर्षाचाही आरंभ. म्हणून अयनारंभवाचक आग्रयण शब्दाचा संवत्सरारंभवाचक आग्रहायण असा स्वरूपमेद झाला,

  • पृषोदर शब्द पृषत् व उदर यांपासून झालेला आहे. यामध्ये तू चा लोप व्हावयास काही नियम नसल्यामुळे हा शब्द अनियमितपणे साधणा-या सर्व शब्दांचा प्रतिनिधि झाला आहे. पोदरादि गण म्हणजे अनियमितपणे साधणाऱ्या शब्दांचा वर्ग, -