या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. अयन शब्दाच्या अर्थाविषयी विचार करतां प्रथमतः सूर्याचे गमन एवढाच त्याचा अर्थ असून पुढे या गमनावरून नियमित झालेला वेळ ह्मणजे अर्ध वर्ष असा अर्थ झाला असे दिसते; व आग्रयणेष्टि या प्रत्येक अयनारंभदिवशी करावयाच्या दोन अर्धवार्षिक इष्टि असाव्यात असे वाटते. मनुस्मृत्यादि वेदकालानंतरच्या ग्रंथांमध्ये आग्रयणेष्टि ह्मणजे नवान्नइष्टि असें मटले आहे. परंतु संपातचलनामुळे ऋतु मागे मागे येऊन या इष्टि अयनारंभी न होता कोणत्या तरी दुसन्या वेळी होऊ लागल्यामुळे मन्वादिकांची वर सांगितलेली कल्पना झाली असावी. कारण आश्वलायनानें श्रौतसूत्रांमध्ये दोनच आग्रयणेष्टि सांगितल्या आहेत. एक वसंतारंभी करावयाची व दुसरी शरदारंभी. वसंत व शरद हे ऋतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे देवयान व पितृयान यांचे झणजे जुन्या उत्तरायणाचे व दक्षिणायनाचे आरंभ होत. आश्वलायनाने हवनासाठी ब्रीहि, श्यामाक व यव अशी तीन धान्ये सांगितली आहेत; व यावरूनच तीन आग्रयणेष्टींची कल्पना पुढे निघाली असे दिसते, कारण * तैत्तिरीय संहितेतील " संवत्सरासाठी दोनदां धान्य शिजवावयाचे" या वचनावरून ही कल्पना मूळची नव्हे हे उघड दिसते. ह्मणून, पूर्वी प्रत्येक अयनाच्या आरंभी एक एक अशा एकंदर फक्त दोन इष्टि होत्या व तेव्हां आग्रयण याचा | आ. गृ. स. १-२-९-१ * तै, सं. ५-१-७-३