या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. पुढील ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे नवान्नभक्षणाशी काही संबंध नव्हता, असे उघड दिसते. कारण असा अर्थ घेतल्याशिवाय या इष्टि आश्वलायनाने सांगितल्याप्रमाणे वसंत व शरद् या ऋतूंच्याच आरंभी का कराव्या याचा उलगडा होत नाही. तर याप्रमाणे अमरसिंहाच्या आग्रहायणी शब्दाची परंपरा पाणिनीच्या पूर्वी वेदकाळापर्यंतही ह्मणजे आग्रयणी या वैदिक शब्दाशी, लावितां येते. पण आग्रयणी शब्दाचा वैदिककाली एक तारकापुंज असा अर्थ होता हे कशावरून ? असा प्रश्न सहजी उत्पन्न होतो. पाणिनीच्या वेळी चालू असलेला आग्रहायणीचा मृगशीर्ष नक्षत्र हा अर्थ अर्थात् परंपरागतच असला पाहिजे. आतां, प्रत्येक अयनाचा आरंभ सूर्य कोणत्या तरी नक्षत्रांत असतानांच होणार. म्हणून पहिल्या अयनाच्या आरंभी सूर्याबरोबर उगवणारे नक्षत्र असा आग्रयण याचा हळूहळू अर्थ झाला असे समजणे हे कांहीं गैर नाही. वैदिक ग्रंथांमध्ये आग्रयण याचा तन्नामक नक्षत्र असा अर्थ देणारे वचन कोठे आढळत नाही. परंतु तैत्तिरीय संहितेमध्ये यज्ञांतल्या ग्रहांचा झणजे पात्रांचा आरंभ आग्रयणापासून असावा असे सांगितले आहे, व त्या पात्रांपैकी दुसन्या दोन पात्रांना शुक्र व मंथिन् अर्शी ग्रहवाचक नावे दिली आहेत. यावरून आग्रयण हेही एक आकाशांतील $ रुद्रामध्येही शुक्र, मंयिन्, आग्रयण, विश्वेदेव, ध्रुव ही नावे एका ठिकाणी लागोपाठ आलेली आहेत.