या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय, डल्यामुळे आर्टेमिस हिने त्यास आर्टिजिया येथे बाणाने ठार मारिलें." दुसरे झणतात., "आर्टेमिसची त्यावर प्रीति बसली. परंतु तिचा भाऊ जो अपाले, त्यास हे न खपल्यामुळे तो समुद्रातील 'दूरची एक वस्तु तिला दाखवून ह्मणाला, 'तुला ही वस्तु बाणाने छेदितां येणार नाही. त्यावर तिने लगेच बाणाचा नेम धरून त्याचें छेदन केले. परंतु पुढे ती वस्तु झणजे समुद्रांत पोहत असेलल्या ओराया चेंच शिर होते असे आढळून आले." आणखी काहीं असें ह्मणत्यात की, "ओरायनने आर्टेमिसचा अयोग्य रीतीने - अभिलाष बेकल्यावरून तिने त्याला एका बाणाने ठार मारिलें." या सगळ्या गोष्टींत अभिलाष, बाण, व शीर्षच्छेदन या वैदिकग्रंथांतील सर्व बाबी आढळून येतात. हे नक्षत्र सूर्योदयीं मावळं • लागणे हे वादळांच्या वगैरे झणजे वर्षाकाळाच्या आगमनाचे लक्षण असें ग्रीक लोकांत मानीत; व त्या अन्वयें या नक्षत्राला * इंब्रिफर अथवा अॅकोसस ह्मणजे वर्षाकाळाला आणणारं अशा अर्थाची नावें त्यांनी दिली होती. ह्मणजे वेदांत जसें श्व या तारकेला वर्षारंभ करणारी व तिलाच शुनाशिरौ या नावाने पर्जन्यागमनसुचक असे मटले आहे, तसेंच हे ग्रीक लोकांचे समजावयाचे. - पण जर्मन लोकांतल्या दंतकथा तर याहूनही स्पष्ट आहेत. प्रो० कुहन म्हणतो--आमच्या प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही दंतकथांमध्ये एक व्याध आहे. . त्याला पूर्वी वोडन ऊर्फ गोडन या नावाने मुख्य देव मानीत असत. हा एका हरिणामागे लागून