या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृत्तिकांमध्ये वसंतसंपात होता याला दीक्षितांनी एक प्रत्यक्ष आधार दाखविला आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये “ कृत्तिका पुष्कळ आहेत व जो त्यांवर अग्न्याधान करतो तो पुष्कळपणा(संकरदी) मिळवतो. ह्मणून कृत्तिकांवर आधान करावे. या मात्र पूर्वदिशेपासून चळत नाहीत. इतर सर्व नक्षत्रे पूर्वदिशेपासून चळतात " अशा अर्थाची वाक्ये आहेत. यांत ' पूर्वेपासून चळत नाहीत,' ।. असें मटले आहे; यावरून त्या नेहमीं पूर्वेस उगवतात, ह्मणजे त्या विषुववृत्तावर आहेत असे सिद्ध होते. विषुववृत्तावरचा व क्रान्तिवृत्तावरचा समान भाग ह्मणजे या ठिकाणी वसंतसंपातबिंदुच होय. यामध्ये थेट पूर्व कोणती हे समजण्यांत जरी एखाद्या अंशाची चूक झाली तरी त्यायोगाने सुमारे २०० वर्षांहून अधिक चूक पडणार -) नाही. या प्रत्यक्ष आधारामुळे कृत्तिकादिगणनेवरील सर्व आक्षेप दूर होतात, इतकेच नव्हे तर इतर कमी दर्जाच्या आधारांना फारच बळकटी येते. कृत्तिकांच्या पुढे जातां जातां रोहिणीमध्ये एकदां वसंतसंपात होता असे दाखवावयास प्रजापति व रोहिणी यांच्या गोष्टीवरून थोडासा आधार मिळतो हे पुढे आलेच आहे. त्याच्यापुढे गेलें ह्मणजे मृगांत ज्यावेळी संपात होता त्या काळाशी येऊन आपण भा. ज्यो. पान १२७. * २-१-२-एता हवै प्राच्य दिशो नच्यवन्ते सर्वाणि ह वा अन्यानि नक्षत्राणि प्राच्यै दिशश्ववन्ते ।