या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ वेदकालनिर्णयः त्याला बाण मारितो अशाविषयी बऱ्याच कथा आहेत. जर्मन कथांमध्ये हा हरिण झणजे सूर्य देवतेचा प्राणी आहे. मणजे ही सर्व गोष्ट वेदांतील रुद्राने ऋष्यरूपी प्रजापतीला मारण्याच्या गोष्टी सारखीच आहे. तसेंच जर्मनीतील व इंग्लंडांतील मध्ययुगीय तपश्चरणनियमांच्या ग्रंथांत असें वर्णन आहे की, जुन्या वर्षाचा शेवट व नव्याचा आरंभ यांच्या मधल्या डाएश्वाल्फटन म्हणजे वैदिक द्वादशाह, या छांवाच्या काळांत त्या काळचे लोक एक खेळ करीत असत; त्यांत दोन माणसें मुख्य काम करणारी असत, एक हरिणाचे सोंग घेतलेला व दुसरा हरिणीचे सोंग घेतलेला. हे बारा दिवस सर्व वर्षांत फार पवित्र असल्यामुळे व त्या वेळी देव मनुष्यांची घरे पाहण्यासाठी पृथ्वीवर उतरतात अशी कल्पना असल्यामुळे वर सांगितलेला खेळ त्या देवांचेच काही तरी चरित्र दाखवीत असावा असे समजण्यास अगदी हरकत नाही. एकंदरीत भारतीय व जर्मन लोकांच्या जुन्या दंतकथांमध्ये फारच साम्य आहे, असे यावरून उघड दिसते." या वर्णनांत आलेला जो हरिणाचा खेळ तो जुनें वर्ष व नवें वर्ष यांच्या मधल्या बारा दिवसांत होत असे. त्या दिवसांना श्वानाचे दिवस अशा अर्थाचें नांव आहे. या दिवसांचा हरिण व व्याध - यांशी काही तरी संबंध दिसून येतो. मागे सांगितलेच आहे की आपलेकडे प्रथम चांद्र व सौर वर्षाचा मेळ बसविण्यासाठी दर * Mediaeval Penitentials. † Dog days