या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. वर्षी चांद्र वर्षांच्या शेवटी बारा दिवस धरित असत. हेच त्या जर्मन लोकांच्या बारा पवित्र दिवसाचे मूळ असले पाहिजे. वैदिक ग्रंथांतही हा द्वादशाह वार्षिक सत्रासाठी दीक्षा घेण्याचा काळ असल्यामुळे पवित्र मानिलेला होता. जर मृग व व्याध हे वर्षारंभ करीत असतांच्या वेळेला अनुलक्षून वर सांगितलेल्या दंतकथा आहेत असें मानिले, तर त्यांची उपपत्ति अगदी सहज लावितां येतो. मागे एके ठिकाणी सांगितलेच आहे की ऋग्वेदांत ऋतुदेवता जे ऋभु त्यांनां श्वान वर्षाच्या शेवटी जागे करीत," असें वर्णन आहे. हीच गोष्ट पाश्चिमात्य देशांतील श्वानांच्या - दिवसांचे मूळ होय असे दिसते. आतां या दिवसांचे वर्षांतील स्थान पालटले आहे; परंतु त्याचे कारण संपातचलनामुळे ऋतु मागे मागे येतात हेच होय. याचे दुसरे उदाहरण ह्मणजे पूर्वीचे व हल्लींचे पितृपक्षाचे स्थान होय. पूर्वी हे दक्षिणायनारंभी असे; पण आतां तसे नाही. याविषयी मागे एके ठिकाणी विवेचन आलेच आहे. तात्पर्य, ओरायन ऊर्फ व्याध या नक्षत्रामध्ये • वसंतसंपात होता त्या वेळेला अनुलक्षून वर सांगितलेल्या जर्मन कथा आहेत असे मानल्याशिवाय, हा हरिणांचा खेळ जुन्या वर्षाच्या शेवटी व नव्या वर्षाच्या आरंभी असलेल्या बारा दिवसांतच कां होत असे व त्या दिवसांना श्वानाचे दिवस असें कां ह्मणत याचा उलगडा होणार नाही. आतां, या विवेचनावरून उघड दिसेल की, जर्मन व ग्रीक लोकांत, ओरायनमध्ये वसंतसंपात असतांना ज्या वेळी वर्षारंभ