या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ वदकालनिर्णय. होत असे त्या काळाचे स्मरण राहिले आहे. पूर्वी दाखविल्याप्रमाणे पारशी लोकांच्या प्राचीन पंचांगावरूनही ह्याच काळाचें अनुमान होते. ह्मणजे पारशी, ग्रीक, जर्मन ल भारतीय हे चार आर्य लोकांचे वर्ग, या कथा उत्पन्न झाल्यावर व आग्रयण उर्फ ओरायन याचे स्वरूप ठरून गेल्यावर एकमेकांपासून विभक्त झाले असे दिसते. ही गोष्ट सिद्ध करण्यास आणखी पुराव्याची गरज आहेसे वाटत नाही. तरी आणखी एका चमत्कारिक गोष्टींतही या राष्ट्रांमध्ये विशेष साम्य दिसून येते. ती जरा मजेदार व महत्वाची असल्यामुळे तीविषयी थोडा विचार करूं. ग्रीक पुराणांमध्ये, ओरायन हा आपल्या वधानंतर नक्षत्ररूपाने आकाशांत राहिला; व तेथें तो, पट्टा, तरवार, सिंहचर्म व गदा ही धारण करणाऱ्या. राक्षसाच्या रूपाने दिसत आहे, असे वर्णन आहे. आतां ओरायनची उत्पत्ति जर वर सांगितलेल्या आर्य राष्ट्रांची फुटाफूट होण्याच्या पूर्वीची असेल, तर या ओरायनच्या उपकरणांविषयीही त्या सर्वांच्या ग्रंथामध्ये काही तरी उल्लेख आढळले पाहिजेत. जरा सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास ते तसे आहेत असे आढळून येईल. वेदांमध्ये मृगशीर्षाची देवता सोम आहे. सोम झणजे पारशी लोकांचा हओम. अवेस्त्यांतील या हओमाच्या सूक्तांत एक श्लोक आहे. त्यांत “हे हओमा तुला मझ्दानें ( ईश्वरानें ) ताराखचित अशी एक मेखला दिली आहे," असें मटले आहे. पण मूळामध्ये ऐव्यओंघनेम असा जो शब्द आहे त्याची मेखला शब्दावरून चांगली कल्पना होणार नाही. यनच्या फटाफूट होण्याच्या त्यात जर वर मार