या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ६७ हा शब्द मूळ झेंद असून त्याचा कस्ति-ह्मणजे पारशी लोक जें पवित्र सूत्र कंबरे भोवती गुंडाळतात तें-असा अर्थ आहे. ह्मणजे हओमाची मेखला ह्मणजे त्याची कस्ति होय. . ओरायनच्या पट्याविषयी पारशी धर्मग्रंथांत जास्त काही उल्लेख नाहीत. तरी वरील श्लोकावरून तशा प्रकारचे उल्लेख आपल्या ग्रंथांत कोठें सांपडतील याचा चांगला सुगावा लागतो. वैदिक ग्रंथांत मृगशीर्षाला प्रजापति किंवा यज्ञ मटलेलं आहे हे पूर्वी दाखविलंच आहे. म्हणून या ओरायनच्या ह्मणजे यज्ञाच्या कमरे भोवतालच्या पट्याला सहजच यज्ञाचे उपवस्त्र उर्फ यज्ञोपवीत ह्मणावे लागेल. पण सांप्रत यज्ञोपवीताचा अर्थ ब्राह्मणाच्या गळ्यांतील सूत्र असा आहे. तरी त्याचा संबंधही ओरायनच्या पट्याशी झणजे प्रजापतीच्या ऊर्फ यज्ञाच्या उपवस्त्राशींच आहे असे दाखवितां येईल. यज्ञोपवीत शब्द यज्ञ व उपवीत यांपासून झालेला आहे. व त्या समासाचे यज्ञासाठी उपवीत किंवा यज्ञाचे उपवीत असे दोन्ही विग्रह होतील. पण पारिजातस्मृतिसारामध्ये “ यज्ञाख्यः परमात्मा य उच्यते चैव होतृभिः । उपवीतं यतोऽस्येदं तस्माद्यज्ञोपवीतकम् ॥" ह्मणजे, परमात्म्याला यज्ञ ह्मणतात, व त्याचे हे उपवीत ह्मणून त्याला यज्ञोपवीत ह्मणतात, असे सांगितले आहे. त्यावरून दुसराच विग्रह ग्राह्य दिसतो. यज्ञोपवीत धारण करतेवेळी म्हणावयाच्या मंत्राचे पूवार्ध असें आहे: