या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. - यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् । ह्मणजे, 'यज्ञोपवीत हे परम पवित्र आहे; तें पूर्वी प्रजापतीबरोबर उत्पन्न झाले.' यामंत्राचे व वर सांगितलेल्या पारशी मंत्राचे बरेंच साम्य आहे. दोघांमध्येही हे उपवीत त्या त्या देवतेच्या बरोबरच उत्पन्न झाले ( सहज ) असें झटले आहे. हे सादृश्य काकतालीय असणे संभवत नाही, व ह्मणून आपल्या पवित्र सूत्राची ह्मणजे जानव्याची कल्पना या मृगशीर्षाच्या पट्यावरूनच निघाली असे दिसते. उपवीत याचा मूळ अर्थ कापडाचा तुकडा असा आहे; सूत्र असा नाही. यावरून यज्ञोपवीताचें मूळस्वरूप कमरेभोंवतीं गुंडाळावयाचा पट असें होतेंसें दिसतें. तैत्तिरीय संहितेंत निवीत, प्राचीनावीत व उपवीत हे शब्द आले आहेत. पण मीमांसक* त्यांचा संबंध जानव्याकडे न लावतां यज्ञाचे वेळी घ्यावयाच्या पटाकडे किंवा मृगाजिनाकडे लावतात. सूत्रांमध्ये वर्णिलेल्या उपनयनविधीमध्येही जानव्याचा संबंध कांहीं नाही. पण आतां मात्र उपनयनामध्ये जानवेंच मुख्य झाले आहे. औ देहिक विधि करतानां व यज्ञ करतानां जानव्याशिवाय आणखी

  • अत्र प्रतीयमानं निवीतादिकं वासोविषयं । न त्रिवृत्सूत्रविषयं । " अजिनं वासो वा दक्षिणतः उपवीय " इत्यनेन सदृशत्वात् । अर्थः-या ठिकाणी निवीतादि शब्दांचा संबंध वस्त्राशी आहे; तिहेरी सूत्राशी (जानव्याशी) नाही. तै. आरण्यक २. १ यांतील “ अजिन ( कातडे ) किंवा वन उजवीकडे नऊन " वगैरे वचनावरून हे उघड दिसते.