या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. एक वस्त्राचा तुकडा परिधान करावयाचा असतो. या चालीचेही मूळ वर सांगितलेल्या गोष्टींतच आहे असे दिसते. परिधान करावयाच्या तीन जानव्यांपैकी एक उत्तरीय वस्त्राच्या ऐवजी आहे, असें देवलाने म्हटले आहे. यावरून जुनी मूळची रीत काय होती हे स्पष्टच दिसते. तात्पर्य पहावयाचे एवढेच की, यज्ञोपवीताचा मूळचा अर्थ लहानसें अरुंद वस्त्र असा असून होतां होतां स्मृतिकाळी त्याचा सूत्र अथवा जानवें असा अर्थ झाला. आतां हे वस्त्र अथवा सूत्र परिधान करण्याची आपली व पारशांची - सध्यांची पद्धति निराळी आहे. पारशी लोक आपल्या प्रजापती प्रमाणेच ह्मणजे कमरेभोंवतीं तें गुंडाळतात; व आपण उजव्या खांकेखालून व डाव्या खांद्यावरून घालतो. पण ही आपली पद्धत मागाहून आली असे दिसते. कारण तैत्तिरीय संहितेमध्ये नेहमींची | जानव्याची स्थिति ह्मणजे निवीत अशी दिली आहे. हल्ली निवीत ‘ह्मणजे दोन्ही हात मोकळे ठेऊन गळ्यांत सरळ माळेप्रमाणे असलेली जानव्याची जागा. परंतु कुमारिल भट्टानें आपल्या तंत्रवार्तिकामध्ये निवीत ह्मणजे कमरेभोवती गुंडाळणे असाही अर्थ दिला आहे. आनंदगिरि व गोविन्दानन्द यांनीही शांकरभाष्यावरील आपल्या टीकेमध्ये असाच अर्थ दिला आहे. यावरून ब्राह्मणही पर्वी आपलें उपवीत पारशी लोकांप्रमाणेच कमरेभोंवतीं बांधीत + ततीयमुत्तरीयार्थ वनाभावे तदिष्यते । * निवीत केचिद्गलवेणिकाबध स्मरन्ति । केचित्पुनः परिकरबंधं ।