या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० वेदकालनिर्णय. असंत, ह्मणजे काही करावयाचे असल्यास ते खरोखरच कंबरबस्ता करीत असत, असे दिसते. यावरून ब्राह्मणांचे जानवें व पारशांची कस्ति ही दोन्ही प्रजापतीच्या उपवीताच्याच प्रतिकृति आहेत हे उघड आहे. आपल्या इकडे ओरायनच्या उपकरणांपैकी एवढे उपवीतच राहिले आहे असे नाही. उपनयन विधीचे जरा निरीक्षण केल्यास मेखला, दंड व चर्म हीही आह्मी राखून ठेविली आहेत असे दिसेल. ज्या मुलाची मुंज करावयाची असते त्याला कमरेभोंवतीं दर्भाची एक मेखला बांधावयाची असते. तिला नाभिस्थानाजवळ तीन गांठी द्यावयाच्या असतात. या गांठी ह्मणजे मृगशीर्षातील वरच्या तीन तारांची प्रतिमाच होत. दुसरें, त्या मुलाला पळसाचा एक दंड घ्यावा लागतो. नवीन मुंज झालेल्या मुलाला आणखी मृगाजिन लागते. वस्तुतः हे मृगाजिन पूर्वी सर्व अंगभर परिधान करावयाचे होते. पण होता होता त्याची मजल जानव्यालाच एक लहानसा तुकडा लावण्यापर्यंत आली. अशा रीतीने मुलाला सज्ज करणे ह्मणजे त्याला प्रजापतीचे स्वरूप देणेच होय. ब्राह्मण होणे ह्मणजे आद्य ब्राह्मण जो प्रजापति त्याचे स्वरूप धारण करणे. प्रजापतीने मृगरूप धारण केले होते, त्याच्या कमरेला मेखला होती व हातांत दंड होता. म्हणून आम्हीही ब्राह्मण होणाऱ्या मुलाला मृगाजिन, मेखला व दंड ही दिली. १ मेखलां त्रिरावर्त्य नाभिप्रदेशे ग्रंथित्रयं कुर्यात् ।