या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. याप्रमाणे ब्राह्मण बटूला प्रजापतीचा म्हणजे ओरायनचा बहुतेक पोषाख मिळाला. पण ओरायनची तरवार त्याजवळ नाही. शिवाय ओरायनचें चर्म सिंहाचे आहे आणि ब्राह्मण बटूचे हरिणाचे आहे. या भेदाचे कारण समजत नाहीं; कदाचित् ओरायन संबंधाने या कल्पना मागाहून उद्भवल्या असतील. सिंहचर्माबद्दल थोडंसें कारण सांगता येईल. सायणाचार्यांनी मृग शब्दाचे हरिण व सिंह असे दोन्ही अर्थ दिले आहेत. या दोन राष्ट्रांनी हे दोन निरनिराळे अर्थ घेतले असावे. मृग शब्दाच्या खऱ्या अर्थाबद्दल ' अजून संशय आहे. म्हणून मृगाजिनाचे चुकीचे सिंहाजिन होऊ शकेल. असो, एकंदरीत नवीन मुंज झालेल्या ब्राह्मण बटूचा पोषाख, ओरायनाचा पोषाख, व पारशी लोकांची कस्ति यांतील वर दाखविलेल्या विलक्षण साम्यावरून, ओरायनचे स्वरूप व तत्संबंधी कथा ही, या तिन्ही लोकांची म्हणजे ग्रीक, पारशी, व भारतीय आर्य यांची फाटाफूट होण्यापूर्वीचीच होत यांत संशय नाही. - आतां, ह्याप्रमाणे या नक्षत्र पुंजाविषयींच्या पौर्वात्य व पाश्चिमात्य कथांमध्ये जर इतकें साम्य आहे, निरनिराळ्या आर्य राष्ट्रांमध्ये त्याच्या स्वरूपाविषयीं जर सारख्याच कल्पना आहेत; तसेंच या नक्षत्र पुंजाच्या खाली व पुढे असलेले तारकापुंज *कनिस मेजर व कॅनिस, मायनर, म्हणजे ग्रीक, कॉन् व प्रोक्कॉन् व आपले

  • व्याघ.
  • पुनर्वसूच्या तारा चार धरल्यास आकाश गंगेच्याजवळ असलेल्या दोन तारा.