या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. श्वन व प्रश्वन् म्हणजे (मागचा ) कुत्रा व पुढचा कुत्रा, हे जर नांवाने व परंपरेनेंही मूळचे आर्यच आहेत तर स्वतः ओरायन यांचेही नांव एकाद्या प्राचीन आर्य शब्दाचेच स्वरूपान्तर असले पाहिजे, असें मानावयास काय हरकत आहे ? ओरायन हे अगदी प्राचीन ग्रीक नांव आहे. ओरायन् , कॉन्, प्रोकान् आणि अक्टॉस या चार शब्दांपैकीं, कॉन् व प्रोक्कॉन् ही संस्कृत श्वन् व प्रश्चन् यांचीच रूपान्तरें व अटॉस हे ऋक्षस्चें रूपान्तर असें ठरविलेले आहे. यावरून, उरलेल्या ओरायनचे सुद्धां एखादें संस्कृत रूपान्तर असलें पाहिजे, असे साहजिक अनुमान होते. परंतु ते ठरविण्याचे काम जरा अवघड आहे. ग्रीक ओरायन हा पारधी होता. ह्मणजे त्याला समान असा आपला रुद्र. परंतु रुद्राच्या नांवांपैकी कोणतेंही नांव ओरायनच्या नावाशी मिळत नाही. परंतु मृगशीर्ष पुंजाच्या आग्रहायण या नांवाचें मूल स्वरूप जो आग्रयण शब्द त्याचे व ओरायनाचे साम्य दिसते. . आग्रयण शब्दांतील आद्य आ बद्दल ग्रीकमध्ये ओ होईल. तसेंच आयन याबद्दल ग्रीकमध्ये इऑन् असे होईल. परंतु र च्या पूर्वी ग् चा लोप कसा झाला हे सांगणे कठीण आहे. असा लोप शब्दाच्या आरंभी होतो अशी उदाहरणे आहेत. पण व्युप्तत्ति शास्त्रज्ञांच्या मतें ग्रीक व संस्कृत यांच्या परस्पर संबंधांत असा १ संस्कृत ग्रावन् याचे ग्रीक लॅऑस् व ब्राण याचे हिनास अशी रूपे आहेत.