या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. लोप शब्दाच्यामध्ये झाल्याचे उदाहरण नाही. इतर भाषांच्या संबंधांत अशी उदाहरणे पुष्कळ आहेत. व तो नियम ग्रीक व संस्कृत यांच्या संबंधालाही लाविल्यास आग्रयण शब्दापासून (ओइऑन् ) ओरायन शब्दाची सिद्धि करता येईल. परंतु ओरायनचे मूळ जरी आपल्याला नक्की समजले नाही तरी निरनिराळ्या आर्य राष्ट्रांतील दंतकथांमधील परस्पर सादृश्यावरून त्याचे मूळस्वरूप काही तरी प्राचीन आर्य शब्दच असला पाहिजे यांत संशय नाही. व हे मूळ जरी नक्की समजले नाही तरी वरील एकंदर विवेचनास कोणताही बाध येत नाही. या उपपत्तीची बहुतेक भिस्त वैदिक ग्रंथांतील वाक्यांवरच आहे, व त्यांचे एकंदर धोरण वसंतसंपात एकदां मृगशीपीत होता हे दाखविण्याचे आहे, असे आपण पाहिलेच आहे. या उपपत्तीला पारशी व ग्रीक दंतकथांवरून चांगली बळकटी येते. तसेंच जर्मन लोकांतील दंतकथांचाही या उपपत्तीवरून चांगला उमज पडतो. पुष्कळ वैदिक गोष्टींचा या उपपत्तीप्रमाणे समाधान कारक अर्थ लागतो हैं पूर्वी दाखविलेंच आहे. अशी जी ही उपपत्ति इतक्या गोष्टींचा, इतक्या आख्यायिकांचा, इतक्या दंतकथांचा समाधानकारक उलगडा करते, ती खरी मानावयास कोणती हरकत आहे? परंतु या उपपत्तीला प्रत्यक्ष प्रमाण ह्मणून वेदवचनेंही दाखवितां येतील; व ती दाखविल्यावर या गोष्टीसंबंधानें शंकेला जागाच रहाणार नाही. असो. वेदांग ज्योतिषांतील कृतिकांच्या स्थितीवरून काढलेल्या अनुमानांस मॅक्समुलरने नांवें ठेविली आहेत. कां तर त्या स्थिती