या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ठेपतो. मृगांत वसंतसंपात होता हे दाखविण्यास फल्गुनीपूर्णमासी उदगयनाबरोबर वर्षारंभ होत असे असे मानून जो एक अप्रत्यक्ष आधार म्हणून घेतला आहे त्यासंबंधाचा दीक्षितांचा मतभेद वर सांगितलाच आहे. याच्या दुसन्या एका आधारासंबंधानेही मतभेद आहे. आग्रहायणासंबंधाने विचार करतांना, मार्गशीर्षामध्ये एकदां वर्षारंभ होता अशी प्राचीन ज्योतिर्विदांची कल्पना आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्युत्पत्तीवर झाली, कारण त्याच्या प्रसिद्ध अर्थाप्रमाणे [वर्षाची पहिली रात्र] पाहिल्यास आग्रहायणिकाची म्हणजे मार्गशीर्षाची पौर्णिमा ही वर्षारंभाची रात्र असली पाहिजे असे होते; परंतु वर्षारंभ वसंतारंभी धरा अथवा उदगयनी धरा, कसेंही केले तरी त्यावरून विलक्षण प्रकारची अनुमाने निघतात म्हणून सदर अर्थ चुकीचा आहे व म्हणून मार्गशीर्ष हा महिना वर्षारंभाचा होता असे मानतां येत नाही असें लो. टिळकांनी प्रतिपादन केले आहे. यावर दीक्षित म्हणतात " मार्गशीर्ष हा । वर्षारंभाचा पहिला मास असे प्रत्यक्ष दाखले आहेत; तर ती गोष्ट नाकबूल करता येत नाही. " त्यांच्या मते मृगशीर्षयुक्त पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वर्ष सुरू होणे असंभवनीय नाही आणि त्याप्रमाणे होत असे. परंतु हे दीक्षितांचे म्हणणे बरोबर दिसत नाही. कारण, ज्या काळासंबंधाने हा वाद चालला आहे त्याकाळी, वसंतसंपातांत सूर्य असतांना वर्षारंभ होत असे; व हे ह्मणणें दीक्षि

  • भा. ज्यो. पान १३३-१३४.