या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ७५ अघा ही नक्षत्रांची नावे ऋग्वेदांत* आली आहेत. तसेंच नक्षत्रांचा सामान्यतः निर्देश आणि चंद्राच्या आणि सूर्याच्या गतींचे ऋतू त्पादकत्त्व यांविषयींचेही उल्लेख त्यांत आहेत. देवयान व पितृयान, या नांवांनी वर्षाची दोन अयने त्या वेळी प्रसिद्ध होती. चांद्र व सौर वर्षाचा मेळ ठेवण्यासाठी धरलेल्या अधिक महिन्याचेही वर्णन ऋग्वेदांता आहे. वरुणाने सूर्यासाठी केलेला विस्तीर्ण मार्ग जो ऋत ज्यांमध्ये द्वादशादित्यांनां ठेविलेलें आहे, व ज्या मार्गाचा सूर्यादि ज्योति कधी अतिक्रम करीत नाहीत, तो झणजे क्रांतिवृत्ताचा पट्टाच होय. प्रोफेसर लड्विग् याच्या मते तर ऋग्वेदामध्ये क्रांतिवृत्त व विषुववृत्त यांमधील नतीचा मणजे तिर्यक्त्वाचाही उल्लेख ॐ सूर्याया वहतुः प्रागात् सविता यमवासृजत् । अघासु हन्यन्ते गावो. र्जुन्योः पर्युह्यते ॥ ऋ. १०, ८५, १३. मी १ सोमेनादित्या बलिनः सोमन पृथिवी मही । अथो नक्षत्राणामेषा उपस्थे सोम आहितः ॥ १०. ८५.२. २ पूर्वापरं चरतो माययैतौ शिशु क्रीळन्तौ परियातो अध्वरम् । विश्वान्यन्यो भुवनाभिचष्ट ऋतूंरन्यो विदघजायते पुनः ॥ १०, ८५, १८. + ऋ. १, २५, ८. $ क्रांन्तिवृत्त झणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरप्याचा मार्ग; व पृथ्वीचें पूर्वपश्चिम मध्यवृत्त झणजे विषुववृत्त. त्याची पातळी आकाशाला मिळेपर्यंत वाढविली ह्मणजे जें होतें तें आकाशाचे विषुववृत्त. हे विषुववृत्त व क्रांतिवृत्त यांमध्ये सुमारे २२ अंशाचा कोण आहे. यालाच वर नति हटले आहे.