या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ वेदकालनिर्णय. आला आहे. वेदकालीं सप्तर्षि हे ऋक्षा:* या नांवानें माहीत होते. ऋग्वेदांत आलेले शभिषक् ह्मणजे शततारका नक्षत्रच असावे असे दिसते. यासंबंधानें ऋग्वेदांतील पांचव्या मंडळांतले चाळीसावें सूक्त तर फार महत्वाचे आहे. या सूक्तामध्ये सूर्याच्या एका खग्रास ग्रहणाचे वर्णन आहे. या सूक्ताच्या एका ऋचेत अत्रीने “सूर्याला तुरीय ब्रह्मानें जाणिलें" असें झटले आहे. त्याचा अर्थ अत्रीने तुरीय नांवाच्या वेधयंत्राने ग्रस्त सूर्याचा वेध घेतला असा केला पाहिजे. या पद्धतीने वरील सूक्ताचा ओढाताण केल्याशिवाय सरळ अर्थ लागतो. यावर कित्येकांचे असें ह्मणणे आहे की, वैदिक ऋषींस ज्योतिषाचे इतके ज्ञान असले तरी त्यांस ग्रहांची माहिती नव्हती. परंतु याही ह्मणण्यांत कांही तथ्य नाही. नक्षत्रे पहात असतां गुरुशुक्रांसारखे सर्व नक्षत्रांहून अधिक तेजःपुंज गोल त्यांना न दिसणे हे केवळ असंभवनीय आहे. शुक्राचे काही दिवस पूर्वेस दिसणे, नंतर काही दिवसांनी पश्चिमेस दिसणे, तसेच त्याचे कांहीं एक नियमित अंशांपर्यन्तच वर येणे या गोष्टींकडे नुसत्या वर वर पहाणान्याचेही लक्ष न लागणे शक्य नाही. पण या संबंधाने नुसत्या अनुमानावरच थांबण्याची गरज नाही. ब्राह्मणकाळी ग्रह माहीत होते यांत तर शंकाच नाही. तैत्तिरीय । ब्राह्मणामध्ये

  • सप्तर्षीनुहस्मयै पुरी (पुरा ऋक्षा) इत्याचक्षते ॥ श. ब्रा. २,१,२,४. । गूळ्हं सूर्य तमसापव्रतेन तुरीयेण ब्रह्मणाऽविंददत्रिः ॥ ५, ४०, ६.

बृहस्पति: प्रथमं जायमानः । तिष्यं नक्षत्रमभिसंबभूव ॥ तै. ब्रा. ३-१-१५.