या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ७९ घातला होता. नक्षत्रांच्या उदयास्तांचे त्यांनी योग्य निरीक्षण केले होते. चंद्रसूर्य व त्यांना माहीत असलेले ग्रह हे आकाशांतील एका ऋत नांवाच्या विशिष्ट पट्याचें* कधीही अतिक्रमण करीत नाहीत हे त्यांना समजलें होतं. चंद्रसूर्याच्या ग्रहणांकडेही त्यांचे बरेंच लक्ष गेले होते. इतक्या गोष्टी ज्या लोकांना परिचित होत्या त्यांना साहजिकच, त्या त्या वेळी उगवणाऱ्या नक्षत्रांवरून, मासारंभ, वर्षारंभ वगैरे ठरवितां आले असले पाहिजेत. यंत्रांच्या साहाय्यावांचूनही दिवस व रात्र केव्हां सारखी होतात, तसेंच सूर्य दक्षिणेकडे अथवा उत्तरेकडे केव्हां वळतो, हे कळणे फारसे कठीण नाही. ह्मणून अशा प्रकारच्या साध्या गोष्टी समजण्याची त्यांची शक्ती होती व तशा त्यांना त्या समजत असत, असे पुढील विवेचनांत धरून चालावयाचे आहे. ऋग्वेदांत पहिल्या $ मंडळांत एक ऋचा आहे तिचा मागें एक दोनदा उल्लेख आला आहेच. तीत " एक श्वान ऋभूनां संवत्सराच्या शेवटी जागे करी" अशा अर्थाचा मजकूर आहे. ती ऋचा अशी:

  • हा पट्टा ह्मणजे राशिचक्र ( zodiac ) होय. क्रान्तिवृत्ताच्या दोहों बाजूंना आठ आठ अंश इतका भाग यांत येतो. चंद्रसूर्य व इतर ग्रह यांतूनच नेहमी फिरतात; याच्या बाहेर कधी जात नाहीत. अश्विन्यादि सर्व नक्षत्रेही या पट्यांतच आहेत.
  1. १, १६१, १३.