या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. सुषुप्वांस ऋभवस्तपृच्छतागोह क इंदनो' अबूवुधत् । श्वानं बस्तो बोधयितारमब्रवीत्संवत्सर इदमद्या व्यख्यत ॥ अर्थ:-" हे ऋभूहो तुह्मीं निजून उठल्यावर विचारिलेंत की हे अगोह्य आतां आमाला कोणी जागे केलें ? बस्त्याने (सूर्य-अगोह्य) तो जागे करणारा श्वान होय असें सांगितले व ह्मणाला, आज संवत्सर आटोपल्यावर त्यानं असें केलें.” ऋभू ह्मणजे सूर्याचे किरण असें यास्क व सायणाचार्य ह्मणतात. परंतु कित्येक दुसऱ्या गोष्टींवरून, कांहीं यूरोपीय पंडितांनी सुचविल्याप्रमाणे, त्यांचा अर्थ ऋतु असा घेणे बरे दिसते. हे ऋभू ह्मणजे ऋतुदेवता वर्षभर काम करून नंतर अगोह्याच्या ह्मणजे सूर्याच्या घरी बारा दिवस पर्यन्त स्वस्थ झोप घेत पडतात, असें वर्णन आहे. हे बारा दिवस ह्मणजे चांद्रसौर वर्षांचा मेळ घालण्यासाठी धरलेले अधिक दिवस होत. यांचा कोणत्याच वर्षांत अन्तर्भाव होत नसल्यामुळे ऋतूंनी आपले काम बंद करून त्या दिवसांत स्वस्थ झोप घेतली ह्मणणे अगदी योग्यच आहे. आतां प्रश्न एवढाच की हा ऋतूंना जागे करणारा कुत्रा कोण ? वरील विवेचनावरून तो कुत्रा ह्मणजे मृगपुंजाजवळचा श्वानपुंजच असला पाहिजे हे उघड आहे. ह्मणजे अर्थातच या तारकापुंजाशी सूर्य आला ह्मणजे वसंत ऋतूस, व नव्या वर्षास सुरुवात होऊन ऋतुदेवता जाग्या होऊन आपले काम चालू करीत. ह्मणजे वंसतसंपात त्यावेळी श्वानपुंजाजवळ होता. श्वानपुंजाजवळ वसंतसंपात असला