या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ८१ ह्मणजे उत्तरायणारंभ फाल्गुनी पौर्णिमेला येतो व मृगशीर्षही नक्षत्रमालेचा आरंभ होते. अशा रीतीने तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण यांतील वचनांचा उलगडा होतो. वसंतसंपात मृगांत होता हैं दाखविण्याला ऋग्वेदांतील हे स्पष्ट वाक्य आहे. दुसराही असाच एक स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तो ज्या सूक्तांत आहे तिचा अर्थ आजपर्यंत कोणास नीट कळलाच नाही. हें सूक्त ह्मणजे दहाव्या* मंडळांतील वृषाकपीचे सूक्त होय. वृषाकपि ह्मणजे कोण ? याविषयी अनेकांचे अनेक तर्क आहेत. पण त्या सर्वांच्या मतें तें सूर्याचे एक कोणते तरी स्वरूप आहे. आतां हे स्वरूप नक्की कोणते असावे हे पहावयाचे. वृषाकपि हा शब्द विष्णु व शंकर या दोहोंचाही वाचकां आहे. पूर्वी मृगशीर्षाच्या वर्णनांत सांगितलेच आहे की, या दोन्ही देवांची कल्पना मृगशीर्षाच्या अनुक्रमें सूर्योदयीं व सूर्यास्ती उगवण्याच्या योगानें सूचित होग्णाऱ्या गोष्टीमुळेच उत्पन्न झाली असावी. ही गोष्ट लक्षांत आणतां वृषाकपि याचा अर्थ या सूक्तांत शस्स्संपाती असलेला सूर्य असा घेतला पाहिजे. या सूक्तांमध्ये जी गोष्ट आहे तिचा मथितार्थ असा-"वृषाकपि हा मृग असून इन्द्राचा मित्र आहे. पण तो जेथें उन्मत्त होतो तेथें यज्ञ बंद पडतात. या मृगाने इन्द्राणीच्या कांहीं आवडत्या वस्तू नासून टाकिल्या. म्हणून ती

  • ऋग्वेद १०-८६. ... हरीविष्णुर्वृषाकपिः ॥ अमर,