या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૮૨ वेदकालनिर्णय. इन्द्राला या मृगाला इतका आवडता करून ठेवण्याबद्दल रामें भरली. पण इन्द्र त्याला शिक्षा न करितां उलट त्याच्या मागोमाग जाऊ लागला. ह्मणून इन्द्राणी रागावून त्या मृगाचे मस्तक छेदण्यास निघाली व त्याच्यामागे तिने एक कुत्रा लावून दिला. पण इतक्यांत इन्द्राने मध्ये पडून तिला समजविली. मग ती म्हणते, झालेली शिक्षा ह्मणजे शीर्षछेदन वगैरे इन्द्राच्या आवडत्या मृगाला न होतां दुसऱ्याच एकाला झाली. नंतर वृषाकपि आपल्या घरी खाली ( नेदीयसः ) जावयास निघाला. तेव्हां इन्द्राने त्यास निरोप देऊन, यज्ञांनां पुनः आरंभ व्हावा म्हणून त्यास आपल्या घरौं पुनः यावयास सांगितले. त्याप्रमाणे जेव्हां वृषाकपि पुनः इंद्राच्या घरी वर ( उदंचः ) आला तेव्हां त्याबरोबर तो पूर्वीचा द्वाड मृग नव्हता. म्हणून वृषाकपि, इन्द्र व इन्द्राणी तेथें आनंदाने भेटली.” आतां या गोष्टींतील महत्वाच्या भागांचा विचार करू. वृषाकपीच्या योगानें यज्ञ बंद पडतात, इन्द्राणीने त्याच्या मागें कुत्रा लावून दिला, तो आपल्या घरीं ह्मणजे खाली (नेदीयसः) गेला व पुनः इन्द्राच्याघरी वर ( उदंचः) आल्यावर यज्ञ पुनः सुरू होतात, या यांतील महत्वाच्या व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत. पण वृषाकपि याचा अर्थ, मृगशीर्षात वसंतसंपात असतांना शरत्संपाती असलेला सूर्य, असा घेतला म्हणजे या सर्व गोष्टी चांगल्या समजतात. मागे एके ठिकाणी सांगितलेच आहे की, पूर्वी उत्तरायणाचा ऊर्फ देवयानाचा आरंभ वसंतसंपातापासून व दक्षिणायनाचा ऊफे पितृयानाचा शरत्संपातापासून होत असे..