या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. my. आतां हे उघडच आहे की, पितृयानामध्ये कोणतीही देवक, व यज्ञ होत नाहीत. ज्या अर्थी मृग नक्षत्र सूर्यास्ती उगवू लागले ह्मणजे पितृयानाला आरंभ होत असे, त्या अर्थी वृषाकपीच्या योगाने यज्ञ बंद पडणे हे योग्यच आहे. त्याच्यामागें कुत्रा लावून दिला आहे. या गोष्टीवरून त्या नक्षत्राची ओळख पटण्याला आतां उशीर लागणार नाही. हा कुत्रा ह्मणजे श्वानपुंजच होय. आतां यापुढे उघडच वृषाकपि दक्षिणायनांत गेल्यामुळे खाली गेला व पुढे वसंतसंपातांत पुनः आल्यावर ह्मणजे देवयानांत आल्यावर वर ह्मणजे उत्तरेकडे असलेल्या इन्द्राच्या घरी आला. मग अर्थात्च नूतनवर्षारंभ झाल्यामुळे यज्ञयागांनाही सुरुवात होते. आतां या वेळी हे नक्षत्र सूर्योदयीं उगवू लागल्यामुळे अर्थात्च तें दिसेनासे झाले. ह्मणजे सूर्य इन्द्राच्या घरीं ह्मणजे उदगयनांत शिरल्यावर तो द्वाड मृग नाहीसा झाला. अशा रीतीने वृषाकपिरूपी सूर्य झणजे शरत्संपातांतील सूर्य असें मानिल्यास या सूक्ताचा बराच समाधानकारक व सरळ अर्थ लागतो. यावरून या सूक्तामध्ये मृगशीर्ष व श्वानपुंज यांचेच वर्णन केवळ आहे असे नाही, तर सूर्य ज्यावेळी विषुववृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस येऊ लागतो तेव्हांची त्याची स्थितीही त्यांत स्पष्टपणें वर्णिली आहे. या गोष्टीशी ऋभुंची गोष्ट जोडली ह्मणजे आपणाला या गोष्टी जेव्हां रचल्या गेल्या तो काळ निश्चित करण्याला बिनचूक व खात्रीलायक परावा मिळतो. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणे यांत दिलेले प्राचीन वर्षारंभ केवळ काल्पनिक नसून