पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १०३ तानि महान्ति सांख्यादि-तंत्राणि सम्यक् दर्शन-अपदेशेन प्रवृत्तानि उपलभ्य, भवेत् केषांचित् मंदमतीनां एतानि अपि सम्यक्-दर्शनाय उपादेयानि इति अपेक्षा । तथा युक्तिगाढत्व-संभवेन सर्वज्ञ-भाषितत्वात् च श्रद्धा च तेषु । इत्यतः तत्-असारता-उपपादनाय प्रयत्यते ॥ ( शारीरकभाष्य, २।२।१ ) ह्मणजे, ६ आक्षेपकाचे ऋणणे असे की, मुमुक्षुना मोक्षप्राप्तीला साधनीभूत असे जें तत्त्वविषयक यथार्थ ज्ञान, त्याचे निरूपण करण्या करित आपला पक्ष (ह्मणजे वेदांत मत ) स्थापन करणे, एवढी गोष्ट योग्य आहे. परंतु ते झाल्या नंतर आतां, ज्या पासून परपक्षाचा द्वेष संपादन होणे या पेक्षा दुसरे कांहीं फळ नाही, असे बेदबाह्य मतांचे निराकरण करण्याची खटपट कशाला पाहिजे ? या आक्षेपाला उत्तर असे की, या निराकरणा पासून कदाचित् द्वेष उत्पन्न होईल हे खरे. तथापि हे जे निराकरण केले आहे ते द्वेषबुद्धीने केलेले नाहीं. तर केवळ सत्याचा निर्णय करण्याच्या हेतूने केले आहे. कारण : विख्यात पुरुषांनी ज्या मतांचा स्वीकार कलेला आहे, व यथार्थ ज्ञान प्राप्त करून देण्याच्या मिषाने (१) स्वमतश्रद्धा-परमतद्वेष तु प्रधान-सिद्धि-अर्थत्वात् अगीकृतौ । न अपि अयं द्वेषः । परपक्षत्व-बुद्धयां हि निरासः द्वर्ष आवहति, न तु तत्त्व-निर्णय-इच्छया कृतः इति मन्तव्यम् ॥ (गोविन्दानन्द ) तत्त्व-निर्णय-अवसाना वीतरागकथा । न च परपक्ष-दूषणं अन्तरेण तत्त्व-निर्णयः क्षक्यः कर्तु, इति तत्त्व-निर्णचाय वातरोगेण अपि परपक्षः दुष्यते, न तु परपक्षतया, इति तु हीतरागकथात्व-ब्याइतिः इत्यर्थः ॥ ( वाचस्पति )