पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/131

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १२७ त्या अर्थी ते परमात्म्या कडूनच निर्माण केले गेले असले पाहिजे. या संबंधाने रामानुजाचायचे ह्मणणे असे:-न च क्षेत्रज्ञानां विचित्र-जगत्-निर्माण-अशक्त्या कार्यत्व-बलेन तत्--अतिरिक्त-कल्पनायां, अनेक-कल्पना=अनुपपत्तेः च, एकः एव कर्ता भवितुं अर्हति । क्षेत्रज्ञानां एवं उपचितपुण्य–विशेषाणां शाक्त–वैचित्र्य-दर्शनेन, तेषां एव अतिशयित-अदृष्ट-संभावनया च, तत्-तत्-विलक्षण-कार्यहेतुत्व-संभवात्, तत्-अतिरिक्त-अत्यन्त-अदृष्ट-पुरुषकल्पना-अनुपपत्तेः च ॥ (श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, * अनुमानवादी पक्षाचे हाणणे असे की, ज्या अर्थी हैं। विचित्र जग निर्माण करण्याला जीवात्मे असमर्थ आहेत, आणि ह्मणून ज्या अर्थी जग कार्य असल्या मुळे जीवात्म्यांहून भिन्न अशा कर्याची किंवा कर्त्यांची कल्पना करणे आवश्यक आहे, आणि ज्या अर्थी अनेक कत्याची कल्पना करणे सयुक्तिक नव्हे; त्या अर्थी सर्व जग एकाच कुत्र्याने निर्माण केले अशीच कल्पना केली पाहिजे. परंतु अनुमानवादीचे हे ह्मणणे ( रामानुजाचार्यांच्या मते ) बरोबर नाही. कारण विशेष पुण्याच्या संचयाच्या योगाने जीवात्म्यांना विचित्र सामर्थ्य प्राप्त होते ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आणि ह्मणून ही गोष्ट संभवनीय आहे की, कांहीं जीवात्म्यांच्या पुण्याचा संचय अतिशय होऊन त्यानीं जगांतील ती ती विलक्षण वस्तु निर्माण केली. आणि ही गोष्ट संभवनीय असल्या मुळे, ज्याच्या विषयी प्रत्यक्षतः कांहींच माहिती नाहीं वे जो जीवात्म्याहून भिन्न, अशा